For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

निलेश लंके शरद पवार गटात सामिल ! पुण्यात शरद पवारांची घेतली भेट

06:05 PM Mar 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
निलेश लंके शरद पवार गटात सामिल   पुण्यात शरद पवारांची घेतली भेट
Nilesh Lanke

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकिय धक्का देत अहमदनगरमधील पारनेर विधानसभेचे विद्यमान आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षामध्ये आज सामील झाले. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तयारी केली असून महायुतीमध्ये ही जागा भाजपला गेल्याने त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटाबरोबर जाणार असल्याच्या बातम्या माध्यमांसमोर येत आहेत. आमदार निलेश लंके यांनी जरी याबाबत स्पष्टीकरण दिले नसले तरी त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भुमिकेमुळे ते जगजाहीर झाले होते. अजित पवार यांनीही निलेश लंके हे पक्ष सोडून गेले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सांगितले होते.

दरम्यान, आज आमदार निलेश लंके यांनी पुण्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले, "आम्ही शरद पवारांचे नेतृत्व कधीच सोडलं नाही...शरद पवारच आमचे सर्वेसर्वा आहेत...पवार साहेब सांगितील तो आदेश मान्य" असे आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत. पण काल भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर राजकिय घडामोडींना वेग आला. अहमदनगर लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव भाजपने जाहीर केल्यानंतर निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.