महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वॉशिंग्टनमध्ये निक्की हेली यांचा विजय

06:03 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ट्रम्प यांचा पहिला पराभव : सुपर ट्यूजडेविषयी उत्सुकता

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेतील वॉशिंग्टन प्रांतात झालेल्या प्रायमरी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या निक्की हेली यांनी विजय मिळविला आहे. हा हेली यांचा पहिला विजय आहे तर प्रायमरी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला पराभव आहे. निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासात रिपब्लिकन प्रायमरी जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

वॉशिंग्टन प्रांतात हेली यांना 63 टक्के तर ट्रम्प यांना केवळ 33 टक्के मते मिळाली आहेत. अमेरिकेत यंदा होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पार्टीमध्ये उमेदवारीसाठी निवडणूक होत आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पार्टी स्वत:चे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत.

रिपब्लिकन पार्टीच्या यंदाच्या प्रायमरी इलेक्शनमध्ये ट्रम्प यांचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे. 2016 मध्ये देखील ट्रम्प हे वॉशिंग्टनमध्ये प्रायमरी निवडणुकीत पराभूत झाले होते. रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि निक्की हेली हे दोनच उमेदवार आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी आयोवा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, साउथ कॅरोलिना समवेत 8 प्रांतांमध्ये विजय मिळविला आहे.

3 दावेदारांची माघार

निक्की या अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीच्या इतिहासात प्रायमरी निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. एलिझाबेथ डोल यांनी 1999 मध्ये रिपब्लिकन पार्टीत अध्यक्षीय उमेदवारीसाठी अर्ज केला होता, परंतु प्रायमरी निवडणुकीपूर्वीच अर्ज मागे घेतला होता. मिशेल बॅचमॅन यांनी 2012 मध्ये अर्ज भरला होता. परंतु आयोवा कॉकसनंतर स्वत:चे नाव मागे घेतले होते. कार्ली फियोरिना यांनी 2016 मध्ये अर्ज भरला होता. पण न्यू हॅम्पशायरमध्ये पराभव पत्करावा लागल्यावर त्यांनीही माघार घेतली होती.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी होत असलेल्या निवडणुकीत 5 मार्च हा सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. या दिवशी अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये निवडणूक होणार असून तेथे याला सुपर ट्यूजडे म्हटले जाते.  सुपर ट्यूजडेपूर्वीच ट्रम्प यांनी निक्की हेली यांच्यावर मोठी आघाडी मिळविली आहे. ट्रम्प यांना एकूण 244 डेलिगेट्सचे समर्थन प्राप्त झाले आहे. तर हेली यांना आतापर्यंत केवळ 24 डेलिगेट्सची साथ मिळाली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article