‘ज्वेल थीफ’मध्ये निकिता दत्ता
सैफ, जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत
वॉर, पठाण यासारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा सिद्धार्थ आनंद लवकरच स्वत:चा नवा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘ज्वेल थीफ :द हीस्ट बिगिन्स’ असून याची निर्मिती मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोब्बी ग्रेवाल आणि कूकी गुलाटी करत आहेत. यात सैफ अली खान, जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता मुख्य भूमिकेत आहे.
हा चित्रपट 25 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. चित्रपटात सैफ हा एका ठकसेनाच्या भूमिकेत आहे. जयदीपने यात एका माफिया बॉसची भूमिका साकारली आहे. कुणाल कपूर आणि निकिता देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
सिद्धार्थ आनंदसोबत पुन्हा जोडले जाण्याचा अनुभव चांगला आहे. अॅक्शन, स्टाइल आणि कहाणीला कशाप्रकारे सादर करायचे याची जाण सिद्धार्थला आहे. ज्वेल थीफमध्ये काम करण्याचा अनुभव आनंददायी होता. जयदीपसाब्sात काम करणे रोमांचक होते, हा चित्रपट प्रेक्षकांनी लवकर पहावा अशी माझी इच्छा असल्याचे सैफने म्हटले आहे.