For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्वयंभू’ चित्रपटात निखिल सिद्धार्थ

06:02 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘स्वयंभू’ चित्रपटात निखिल सिद्धार्थ
Advertisement

चित्रपटाच्या टीझर पोस्टर्समुळे वाढली उत्सुकता

Advertisement

निखिल सिद्धार्थ या अभिनेत्याला ‘कार्तिकेय 2’ या चित्रपटामुळे देशभरात ओळख मिळाली. आता तो ‘स्वयंभू’ या चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात निखिल एक अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली योद्ध्याच्या अवतारात दिसून येतोय.

जबरदस्त अॅक्शन दृश्यं, आकर्षक व्हिज्युअल्स आणि एनर्जेटिक बॅकग्राउंड स्कोरने युक्त या टीझरने प्रेक्षकांमध्ये वातावरणनिमिर्ती केली आहे. या टीझलने पाहता पाहता 1.8 कोटी ह्यूजचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाचे एक गीतही प्रदर्शित कण्यात आल्याने संगीत आणि व्हिज्युअल अनुभवावरून उत्सुकता आणखी वाढली आहे.

Advertisement

भारताच्या सुवर्णयुगायच भव्यतेदरम्यान चित्रपटाचा टीझर एक अशी कहाणी सादर करतो, जी संस्कृती, वीरता आणि परंपरांमध्ये दृढपणे वसलेली आहे. या कहाणीच्या केंद्रस्थानी ‘सेंगोल’ असून तो वारसा, न्याय आणि धर्माच्या अवतीभवती फिरणारी एक महागाथा दर्शवितो. निखिल सिद्धार्थ यात अत्यंत प्रभावशाली अंदाजात दिसून येत आहे.

य चित्रपटासाठी उत्कृष्ट आणि दिग्गज तंत्रज्ञ आणि क्रिएटिव्ह लोकांची एक असाधारण टीम एकत्र आली आहे. भरत कृष्णमाचारी यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटाला केजीएफ आणि सालार फेम रवि बसरुर यांचे संगीत लाभले आहे. तर बाहुबली आणि आरआरआरचे सिनेमेटोग्रॉफर के.के. सेंथिल कुमार यांनी याच्या व्हिज्युअल्सना आकर्षक रुप दिले आहे.

स्वयंभू हा चित्रपट पिक्सेल स्टुडिओजकडून निर्माण करण्यात आला आहे. भारताचा समृद्ध इतिहास आणि अमर गौरवाला एका महाकाव्य आदरांजलीच्या स्वरुपात सादर करण्यात येणारा हा चित्रपट यंदाच प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.