निखिल, चेतन, वासी पुढील फेरीत
बेळगाव : टिळकवाडी येथील अॅट व्रुबेल स्नूकर अकादमी आयोजित निमंत्रीतांच्या आंतरराज्य स्नूकर स्पर्धेत तिसऱ्या दिवशी अमृत, सुधन, प्रथमेश, निखिल, चेतन, वासी यांनी पुढील फेरीत प्रवेश केला. टिळकवाडी येथील अॅट व्रुबेल स्नुकर अकादमीच्या सभागृहात खेळविण्यात आलेल्या सामन्याचे निकाल राहुल एन.-बेळगाव वि.वि. अंकुश डी.-इचलकरंजी 69-27, 47-36, 38-65, 58-38 अशा 3-1, रमेश गोकाक वि.वि. ऋषी जे.-कोल्हापूर 0-1, 45-32, 40-30, 35-75, 65-16 अशा 3-2, फैजान एन. धारवाड वि.वि. अॅरॉन बी.-इचलकरंजी 0-1, 77-60, 38-37, 56-4 अशा 3-2, ओमकार व्ही.-कोल्हापूर वि.वि. सुधन्वा-बेळगाव 49-37, 55-47, 50-32 अशा 3-0, अमृत-इचलकरंजी वि.वि. अबू-बेळगाव 62-50, 47-32, 57-29 अशा 3-0, अक्षित-धारवाड वि.वि. निरज कोल्हापूर 62-43, 43-16, 85-4 अशा 3-0, साईल के.-बेळगाव वि.वि. मालतेश-धारवाड 62-25, 15-55, 74-42, 61-53 अशा 3-1, वासी-बेळगाव वि.वि. प्रदीपकुमार-हुबळी 29-48, 52-40, 10-45, 61-23, 54-34 अशा 3-2, दुसऱ्या फेरीत फैजन वि.वि. शिवू-गोकाक 50-41, 14-70, 93-37, 53-31 अशा 3-1, अमृत-इचलकरंजी वि.वि. अक्षय-धारवाड 53-31, 55-45, 60-50 अशा 3-0, सुधीन-गोकाक वि.वि. राहुल एन.-बेळगाव 57-64, 66-80, 56-14, 59-45, 49-37 अशा 3-2, प्रथमेश एस.-बेळगाव वि.वि. निखिल-कोल्हापूर 55-42, 10-47, 48-46, 57-49 अशा 3-1, चंदन डी-बेळगाव वि.वि. ओमकार व्ही.-कोल्हापूर 15-60, 74-62, 59-81, 62-13, 72-17 अशा 3-2 अशा, वासी-बेळगाव वि.वि. रमेश-गोकाक 30-63, 39-54, 43-30, 45-38, 75-62 अशा 3-2 गुणांनी पराभव करुन पुढील फेरी गाठली.