For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेन ड्राईव्ह व्हायरलमागे निजद आमदार ए. मंजू?

06:14 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेन ड्राईव्ह व्हायरलमागे  निजद आमदार ए  मंजू
Advertisement

संशयित आरोपी नवीन गौडाच्या फेसबुकवर पोस्ट व्हायरल : ‘तो’ कोण मला माहित नसल्याचे आमदारांचे स्पष्टीकरण

Advertisement

 प्रतिनिधी/ बेंगळूर

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात निजदच्या आणखी एका आमदाराचे नाव गोवले गेले आहे. यासंदर्भात संशयित आरोपी नवीन गौडा याच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. मला 20 एप्रिलला पेन ड्राईव्ह मिळाला होता. त्यानंतर 21 एप्रिल रोजी आपण अरकलगुडूचे आमदार ए. मंजू यांना माऊती कल्याण मंडपात पेन ड्राईव्ह दिला होता. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या म्हणण्यानुसार व्हायरल व्हिडिओमागे अरकलगुडू आमदार असू शकतात, अशी पोस्ट करण्यात आली आहे. सध्या संशयित नवीन गौडा यांची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे.

Advertisement

याबाबत म्हैसूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार ए. मंजू म्हणाले की, नवीनगौडा कोण हे मला माहीत नाही. त्याने मला एक पेन ड्राईव्ह दिलाय तर सगळ्यांना त्यानेच शेअर केला असेल. त्यामुळे एसआयटी अधिकाऱ्यांनी नवीनगौडा याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली. नवीनगौडाने रस्ते, उद्याने, दुकानांसमोर पेन ड्राईव्ह फेकले आहेत. संपूर्ण गावाला पेन ड्राईव्ह वितरित केल्यानंतर त्याने मला पेन ड्राईव्ह दिल्याने सांगितले आहे. मी एच. डी. देवेगौडा कुटुंबाच्या जवळ असल्याने माझ्यावर आरोप केले जात आहेत, असेही मंजू यांनी स्पष्ट केले.

आपण लग्नासाठी माऊती कल्याण मंडपात गेलो होतो हे खरे आहे. नवीन गौडा कोण हे मला माहीत नाही. एच. डी. रेवण्णा यांच्या अटकेविरोधात आम्ही पहिल्यांदाच आंदोलन केल्यानंतर आमची बदनामी केली जात आहे. त्याने मला पेन ड्राईव्ह दिले आहे असे म्हटल्यावर इतरांनाही तोच दिला असेल. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी नवीन गौडा यांना तात्काळ अटक करावी. माझ्या माहितीनुसार निजदला संपवण्याचा कट आहे. पण निजदला कोणीही संपवू शकत नाही. मी सर्व पक्ष पाहिले असून सध्या जनता दलात आहे. एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबियांच्या कठीण प्रसंगी मी उभा राहीन, असेही त्यांनी सांगितले.

नवीन गौडावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देत एसआयटीवर विश्वास ठेवायचा असेल तर त्यांनी प्रथमत: नवीन गौडा यांना अटक करावी. अन्यथा राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वी अनेक प्रकरणे तपासासाठी सीबीआयकडे सोपविली होती. पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणीही आमदार ए. मंजू यांनी केली.

Advertisement
Tags :

.