For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : साताऱ्यात 'अग्निवीर' साठी रात्री भरती प्रक्रिया !

03:28 PM Nov 13, 2025 IST | NEETA POTDAR
satara   साताऱ्यात  अग्निवीर  साठी रात्री भरती प्रक्रिया
Advertisement

           साताऱ्यात रात्री १२ वाजल्यापासून अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू

Advertisement

सातारा : साताऱ्यात पोलीस कवायत मैदानावर होणाऱ्या 'अग्निवीर' भरतीसाठीची शारीरिक चाचणी (मैदानी) परीक्षा प्रथमच रात्री घेण्यात येणार आहे. चाचणी देताना उमेदवारांना उन्हामुळे चक्कर, फिट्स येऊ नयेत या उद्देशाने लष्कर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्या उमेदवारांची आरोग्य तपासणी मात्र दिवसा घेण्यात येणार आहे.

अग्नीवर भरतीला १५ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठी १० हजार उमेदवार लेखी परीक्षा देऊन शारीरिक चाचणी (मैदानी) परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. सर्व उमेदवारांना पोलीस मैदानावर रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत चाचणी द्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत साताऱ्यात राबिवली जाणार आहे. उन्हामुळे उमेदवारांना चक्कर येणे, फिट येणे असा त्रास होऊ नये यासाठी रात्री शारीरिक चाचणी घेण्यात येणार
आहे.

Advertisement

साताऱ्यात अशी चाचणी प्रथमच होत आहे. यामध्ये १.६ किलोमीटर धावणे, पुलप्स, बिम, ९० फुटांचा खड्डा पार करणे, झिगझेंग बॅलन्स असे प्रकार आहेत. या भरती काळात पोवई नाक्यावरून लोणंदला जाणारा रस्ता रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लष्करातील कोल्हापूर विभागातील २०० जवानांना नियुक्त करण्यात आले आहे. जवानांच्या खाण्याची आणि राहण्याची सोय शाहू स्टेडियम येथील वसतिगृहात केली आहे. शारीरिक परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांचे मेडिकल शाहू स्टेडियम येथील बॅडमिंटन कोर्ट येथे करण्यात येणार आहे.

प. महाराष्ट्र, कोकणातून १० हजार उमेदवार

निवड झालेल्या अग्निवीराला चार वर्षासाठी देशसेवेत सामावून घेणार आहे. त्यापैकी २५ टक्के जवानांना त्यांचा फिटनेस आणि लष्करी काम पाहून भारतीय लष्करात कायम केले जाणार आहे. साताऱ्यात होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा येथील एकूण १० हजार उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.

Advertisement
Tags :

.