For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिपी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंगचा शुभारंभ

03:24 PM Jan 08, 2026 IST | अनुजा कुडतरकर
चिपी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंगचा शुभारंभ
Advertisement

परूळे/ प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे चिपी विमानतळावर बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता नाईट लँडिंग करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार रात्री विमानतळावर शासकीय आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झाला होता. मात्र, दौरा रद्द झाल्याने नाईट लँडिंगची चिपी विमानतळावरील संधी हुकली . चिपी विमानतळावर नाईट लँडिंगच्या सर्व सुविधा पूर्ण झाल्या असून काल रात्री अचानक नाईट लँडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या विमानतळाहून पालकमंत्री नितेश राणे व मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार संपूर्ण पोलीस यंत्रणा व मंत्री महोदयांच्या गाड्यांचा ताफा विमानतळावर पोहोचला होता. मात्र उशिरा १०.३० वाजण्याच्या सुमारास राणे बंधूंचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज आला आणि पुन्हा एकदा नाईट लँडिंग होता होता रद्द झाले. नेव्ही दिनानिमित्त मालवण येथे आलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळावरून नाईट लँडिंग ने विमानाने प्रवास केला होता. त्यानंतर त्या विमानतळावरून नाईट लँडिंग ची सुविधा सुरू व्हावी अशी मागणी होत होती. या करिता मोठ्या प्रमाणात निधी पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांनी उपलब्ध करून दिला आणि विमानतळावर आता नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध झाली आहे . आता प्रत्यक्षात ट्रायल घेऊन मुंबई सिंधुदुर्ग विमान सुरू करावे अशी मागणी होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला आहे.नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) या विमानतळाला IFR (Instrument Flight आणि Rules) लायसन्स आणि ऑपरेशन्ससाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या निर्णया मुळे आता चिपी विमानतळावर २४x७ म्हणजेच रात्रंदिवस आणि कोणत्याही हवामानात सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच पालकमंत्री नितेश राणे खास विमान घेऊन नाईट लँडिंग चा शुभारंभ करणार असल्याचे संकेत मिळत आहेत

Advertisement
Advertisement
Tags :

.