Kolhapur News | गंगावेशात 'रात्रीचा खेळ' रंगला! पैलवान आणि खाद्यविक्रेत्यात फ्री-स्टाईलने हाणामारी
कोल्हापुरात किरकोळ कारणावरून मारामारी
कोल्हापूर -गंगावेश येथील रेगे तिकटी येथे शनिवारी रात्री खाद्यपदार्थाच्या गाडीजवळ अचानक कुत्रे आल्याच्या कारणावरुन पैलवान आणि खाद्यपदार्थ विक्रेता यांच्यात मारामारीचा प्रकार घडला. मारामारीच्या प्रकारात एका मोपेडचीमोडतोड करण्यात आली आहे.
रेगे तिकटी येथे गाडीद्वारे एक विक्रेता खाद्यपदार्थांची विक्री करण्याचा व्यवसाय करतो आहे. शनिवारी रात्री गाडीजवळून २ पैलवान पाय आपटत जात होते. त्यांच्या पायाच्या आवाजाने खाद्यपदार्थाच्या गाडीकडे एक कुत्रे आले. त्याचा राग खाद्यपदार्थ विक्रेत्याला आला.
या रागातून त्याने मल्लांना शिवागीळ केली. आपल्या भावाच्या साथीने पैलवानांना मारहाण केली. थोड्या वेळाने पैलवानांनी अन्य सहा ते सात जणांना घटनास्थळी आणून खाद्यपदार्थ विक्रेत्यालाही मारहाण केली. तसेच एका मोपेडचे मोठे नुकसान केले.