For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mahabaleshwar News | महाबळेश्वरच्या विल्सन पॉईंटवर रात्री बंदी; वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय

03:38 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
mahabaleshwar news   महाबळेश्वरच्या विल्सन पॉईंटवर रात्री बंदी  वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement

महाबळेश्वर :महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या विल्सन पॉ ईंट येथे रात्रीच्या वेळेत वाढत चाललेल्या असामाजिक प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे विल्सन पॉईंट सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत पर्यटक आणि नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल महादेव मोहिते यांनी दिली,

Advertisement

महाबळेश्वर शहरापासून अत्यंत जवळ आणि परिसरातील सर्वाधिक उंच ठिकाण म्हणून ओळखला जाणारा व बारा महिने सुरु असलेला विल्सन पॉईंट सूर्योदयाच्या विहंगम दृश्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. दररोज पहाटे मोठ्या संख्येने पर्यटक येथे सूर्योदयाचा आनंद घेण्यासाठी येतात. तसेच स्थानिक नागरिक सकाळी चालणे, व्यायाम आणि आरोग्यविषयक उपक्रमांसाठी या परिसराचा वापर करतात.

मात्र, दुपारनंतर येथे गर्दी कमी होत असल्याने आणि रात्रीच्या वेळी परिसर तुलनेने निर्मनुष्य राहत असल्याने काही असामाजिक घटकांकडून याठिकाणाचा गैरवापर केला जात असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळी मद्यपान, गांजाचे सेवन तसेच इतर बेकायदेशीर प्रकार वाढल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. याशिवाय मद्यपानानंतर काचेच्या बाटल्या फोडून टाकण्याचे प्रकारही वारंवार घडत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत होती. फुटलेल्या काचेच्या तुकड्यांमुळे सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक, पर्यटक तसेच वन्यजीवांनाही धोका निर्माण होत असल्याची बाब अनेक नागरिकांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. वन विभागाच्या नव्या निर्णयानुसार सूर्योदयाच्या वेळीच पुन्हा प्रवेश खुला केला जाईल.

Advertisement

तसेच या परिसरात वनजागोजागी फलक हुल्लडबाजी व पॉईंटचा गैरवापर करणाऱ्या असामाजिक घटकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची तसेच कचरा टाकून अस्वछता करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्यासाजे फलक वन विभागाने या पॉईंटवर जागोजागी लावले आहेत. विभागाकडून नियमित गस्त आणि विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.