महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निफ्टीचा विक्रम : सेन्सेक्सची सलग आठवी तेजी

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयटी व औषध क्षेत्रांच्या समभागांची चमक : सेन्सेक्स सलग आठव्या दिवशी वधारला

Advertisement

मुंबई : चालू सप्ताहामधील बुधवारच्या सत्रात व एकंदर आठव्या सत्रात बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले. आयटी आणि औषध या क्षेत्रांच्या मजबूत स्थितीमुळे बाजारात तेजी कायम राहिली आहे. प्रामुख्याने 50 समभागांच्या निफ्टीने नवा विक्रम प्राप्त करत बुधवारी 25,000 चा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्सने आठव्या दिवशीही तेजी कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसखेर 73.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 81,785.56 वर बंद झाला आहे. तर एनएसई निफ्टी दिवसअखेर 34.60 अंकांच्या मजबूतीसोबत निर्देशांक 25,052.35 वर बंद होत नव्या विक्रमाची नोंद बुधवारी केली आहे.

Advertisement

निफ्टी मिडकॅप 100 मध्ये मात्र बुधवारी 0.12 टक्क्यांची घसरण राहिली होती. विविध क्षेत्रांमधील स्थिती पाहिल्यास यामध्ये निफ्टी आयटी 1.66 टक्क्यांनी मजबूत राहिला तसेच औषध क्षेत्रानेही 1.21 टक्क्यांनी तेजीची नोंद केली आहे. एफआयआय निव्वळ खरेदीदार राहिले आणि आगामी महिन्यात अमेरिकन फेडरलकडून व्याजदर कपात होण्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास वाढलेला असल्याने त्याचा फायदा भारतीय बाजाराला झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

निफ्टीच्या समभागांमध्ये मोठी तेजी राहिली. यात एलटीआय माइंडट्रीचे समभाग वधारले. तर विप्रो, डिव्हीस लॅब, भारती एअरटेल आणि इन्फोसिस यांचे समभाग हे वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये निफ्टी मीडियात सर्वाधिक घसरण राहिली असून ही घसरण जवळपास 1.41 टक्क्यांवर राहिली. तर मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स, अदानी एंटरप्राईजेस, श्रीराम फायनान्स आणि ब्रिटानिया यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. आशियामधील बाजारांमध्ये जपानचा निक्केई 0.22 टक्क्यांनी तेजीत तर हाँगकाँगचा हँगसेंग 1.02 टक्क्यांनी घसरणीत राहिला. चीनचा शांघाय कम्पोझिट 0.40 टक्क्यांनी प्रभावीत झाला. तर कोरियाचा कॉस्पी 0.022 टक्क्यांनी वधारला आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article