For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

6 वर्षातील निफ्टीची सर्वात मोठी मासिक घसरण

06:52 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
6 वर्षातील निफ्टीची सर्वात मोठी मासिक घसरण
Advertisement

सेन्सेक्स 1635 अंकांनी तर निफ्टी 488 अंकांनी कोसळला

Advertisement

मुंबई :

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे उद्भवलेली स्थिती जशीच्या तशी असल्याकारणाने शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिसून आला. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत बंद झाले. निफ्टी 1635 अंकांनी कोसळला होता. बँक व आयटी निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. गेल्या सहा वर्षांमध्ये पाहता निफ्टी निर्देशांकांची सर्वात मोठी मासिक घसरण मानली जात आहे.

Advertisement

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1635 अंकांनी घसरत 71947 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजारात 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 488 अंकांनी कोसळत 22331 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकदेखील 1999 अंकांच्या घसरणीसोबत 50275च्या स्तरावर बंद झाला होता. निफ्टीतील 50 समभागांपैकी 46 समभागांची सकारात्मक कामगिरी झाली होती. तर सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभागांमध्ये विक्री दिसून आली.

हे समभाग तेजीत

शेअरबाजारात सोमवारी हिंडाल्को, कोल इंडिया, ओएनजीसी, पॉवर ग्रीड यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले होते.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे घसरणीमध्ये असणाऱ्या समभागांची संख्या सोमवारी अधिक होती. यामध्ये मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टायटन, लार्सन टूब्रो, विप्रो, सनफार्मा, नेस्ले इंडिया, सिप्ला, इन्फोसिस, बजाज ऑटो, आयटीसी, एनटीपीसी, टाटा मोटर्स पीव्ही, जिओ फायनान्स, आयशर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, इंडिगो, एसबीआय, ट्रेंड, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग समाविष्ट होते. क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता सर्वच क्षेत्रे नुकसानीसोबत बंद झाली. यातही सर्वाधिक घसरणीत निफ्टी एफएमसीजी (888 अंक),  फायनान्सीयल्स (851 अंक), ऑटो (582 अंक) व आयटी निर्देशांक (479 अंक) यांचा समावेश होता. या सोबत निफ्टी कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा, मेटल, ऑईल आणि गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांकसुद्धा कमकुवत होत बंद झाले. बँकिंग निर्देशांकातील सर्व 14 बँकांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.

Advertisement
Tags :

.