महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निफ्टी प्रथमच 25,000 च्या उंचीवर

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिलायन्सचे समभाग तेजीत : निर्देशांकांची कामगिरी नव्या विक्रमाकडे

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँक व रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात खरेदी राहिली होती. या सकारात्मक कामगिरीमुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक विक्रमी टप्प्यावर बंद झाले आहेत. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 126.21 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.15 टक्क्यांसोबत 81,867.55 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी हा 59.75 अंकांनी मजबूत होत निर्देशांकाने प्रथमच 25,010.90 ची उंची प्राप्त करत नवा विक्रम नोंदवला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये गुरुवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग हे वधारले आहेत. यासह पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया आणि अदानी पोर्ट यांचे समभाग हे सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. यासह मारुती सुझुकी, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन आणि टीसीएस यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 मधील 15 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. यात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक आणि टाटा मोर्ट्स यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीत राहिले. तर लार्सन अॅण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कोटक बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, आयटीसी आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि सनफार्मा यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.

काही क्षेत्रांमध्ये चमक

बाजारांमध्ये विविध क्षेत्रांमधील कामगिरीमध्ये निफ्टीमधील एनर्जी, ऑईल अॅण्ड  गॅस, निफ्टी औषध आणि निफ्टी बँकेचा निर्देशांक वधारुन बंद झाल्याचे पाहायल मिळाले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article