निफ्टी तेजीसह तर सेन्सेक्स हलक्या घसरणीसोबत बंद
निफ्टी 53 अंकांनी तेजीत, अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने वाढवले व्याजदर
वृत्तसंस्था/मुंबई
गुरुवारी सेन्सेक्सच्या एक्सपायरीदिवशी निफ्टी मात्र तेजीसह बंद झाला तर सेन्सेक्स अल्पसा घसरणीत राहिला होता. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. याचा काहीसा परिणाम बाजारावर दिसला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 21 अंकांनी घसरत 74314 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 53 अंकांनी वाढत 23270 अंकांवर बंद होताना दिसला. निफ्टी आयटी निर्देशांक अल्पशा तेजीसह बंद झाला तर निफ्टी बँक निर्देशांक 236 अंकांनी घसरत 56055 च्या स्तरावर बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अखेर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली पण देशांतर्गत बाजाराला याची आधीच कल्पना होती. त्यामुळे बाजारावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
कच्च्या तेलाच्या किमती नरम पडल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने घसरणीतून जोरदार पुनरागमन केले. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 प्रत्येकी अर्ध्या टक्क्याहून अधिक तेजी दाखवत बंद झाले. बाजाराला फार्मास्युटिकल, मेटल, ऑटो तसेच रिअल्टी क्षेत्रातील समभागांनी तेजीसह कामगिरी करत आधार दिला. रिअल्टी आणि फार्मा क्षेत्राचे निफ्टी निर्देशांक 1.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले. दुसरीकडे मेटल आणि ऑटो कंपन्यांच्या समभागांनी बाजारात दमदार कामगिरी केली. दोन्ही क्षेत्राचे निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले. निफ्टी पीएसयू बँक किंचित घसरला. तर निफ्टी प्रायव्हेट बँक सुमारे अर्ध्या टक्क्याने खाली आला. 6 सप्टेंबर 2026 रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 4,74,23,712.00 कोटी रुपये होते. 17 सप्टेंबर 2026 रोजी ते वाढून 4,76,10,906.37 कोटी रुपयांवर पोहचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात गुरुवारी 187,194.36 कोटींची वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले.
कोण तेजीत, कोण घसरणीत
निफ्टीत एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, टाटा मोटर्स पीव्ही, डॉ. रे•िज लॅब्ज, बीईएल यांचे समभाग तेजीत होते. तर बाजारात ओएनजीसी, टायटन, एचडीएफसी बँक, एचयुएल, कोल इंडिया, नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र कमकुवत होत बंद झाले. सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स तेजीत होते.

- एचडीएफसी लाइफ 557
- टाटा मोटर्स पीव्ही 314
- एसबीआय लाइफ 1766
- डॉ. रे•िज लॅब्ज 1175
- बीईएल 395
- इंडिगो 4845
- टाटा स्टील 187
- जियो फाय. 229
- इटर्नल 322
- श्रीराम फायनान्स 995
- एशियन पेंटस् 2454
- मारुती सुझुकी 12338
- टाटा कंझ्युमर 1013
- सिप्ला 1376
- बजाज फिनसर्व्ह 1859
- मॅक्स हेल्थकेअर 1037
- बजाज फायनान्स 1015
- अदानी पोर्टस 1738
- अपोलो हॉस्पिटल 8768

- ओएनजीसी 232
- टायटन 4841
- एचडीएफसी बँक 713
- कोल इंडिया 418
- हिंदुस्थान युनि. 1942
- नेस्ले इंडिया 1370
- आयसीआयसीआय 1347
- बजाज ऑटो 11500
- ग्रासिम 3173
- विप्रो 166
- एसबीआय 988
- इन्फोसिस 1058
- आयशर मोटर्स 7493
- अॅक्सिस बँक 1240
- आदित्य इन्फोटेक 3378
- पीबी फिनटेक 1765
- पतंजली फुडस् 354
- मीशो 207
- पीएनबी हाऊसिंग 1103
- फेडरल बँक 332
- ऑईल इंडिया 477
- रॅडिको खेतान 4380