नफावसुलीमुळे निफ्टी अल्पशा तेजीसह बंद
सेन्सेक्स मात्र घसरणीत: टाटा स्टीलचे समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी शेअरबाजारात नफावसुलीच्या कारणास्ताव दोन्ही निर्देशांक सपाट स्तरावर बंद झाले. निफ्टी निर्देशांक मात्र 31 अंकांनी वधारत बंद झाला. टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक तेजीत राहिला.
सोमवारी रक्षाबंधनादिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 12 अंकांनी घसरुन 80424 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 31 अंकांनी वाढत 24572 अंकांवर बंद झाला. निफ्टीची सुरुवात 95 अंक वाढीसह 24636 अंकांवर तर सेन्सेक्सची सुरुवात 243 अंकांच्या वाढीसह 80680 अंकांवर झाली होती. शुक्रवारीही शेअरबाजारात चांगली तेजी राहिली होती. पोलाद उत्पादन क्षेत्रातील कंपनी टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. टाटा स्टीलचा समभाग 2.97 टक्के वाढीसह 153 रुपयांवर बंद झाला. टीसीएसचा समभाग 1.68 टक्के वाढत 4490 रुपयांवर बंद झाला. याशिवाय एनटीपीसी 1.27 टक्के वाढीसह 403 रुपये, जेएसडब्ल्यू स्टील स्टील 1.03 टक्केसह 917 रुपयांवर बंद झाला. महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग मात्र 2.66 टक्के घसरले होते. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकावर नजर टाकल्यास निफ्टी स्मॉलकॅप 1.92 टक्के इतका वाढत 8815 वर बंद झाला. निफ्टी धातू 1.98 टक्के वाढीसह, ऑइल अँड गॅस 1.52 टक्के वाढत बंद झाला. आयटी निर्देशांकही 0.88 टक्के तेजीत होता. सर्वाधिक घसरण ही निफ्टी ऑटो निर्देशांकात प्रामुख्याने सोमवारी पाहायला मिळाली. ऑटो निर्देशांक 0.89 टक्के घसरत बंद झाला तर निफ्टी खासगी बँकांचा निर्देशांक 0.48 टक्के घसरणीत होता. कच्च्या तेलावरील विंडफॉल करात कपात करण्यात आल्याने या कंपन्यांचे समभाग तेजीत होते.
हे समभाग तेजीत
बाजारात हिंडाल्को, श्ा़dरीराम फायनान्स, बीपीसीएल, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रिज, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, ब्रिटानिया, स्टेट बँक, डिव्हीस लॅब्ज, ओएनजीसी, टायटन, एशियन पेंटस यांचे समभाग तेजीत होते.