For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक्स्ट्रीम संघाकडे निधी वॉरियर्स चषक

10:09 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक्स्ट्रीम संघाकडे निधी वॉरियर्स चषक
Advertisement

जयंत जाधव मालिकावीर-सामनावीर पुरस्कार

Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित निधी वॉरियर्स चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्टस् संघाने युनायटेड बालाजीचा 10 धावांनी पराभव करून निधी वॉरियर्स चषक पटकाविला. जयंत जाधव याला सामनावीर व मालिकावीराने गौरविण्यात आले. भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात एक्स्ट्रीम संघाने फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 147 धावा केल्या. त्यात भावित पुजारीने 1 षटकार, 2 चौकारांसह 26, चेतन देसाईने 1 षटकार, 4 चौकारांसह 25 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे रवी जयरामने 27 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी संघाचा डाव 18.5 षटकात सर्वगडी बाद 137 धावात आटोपला. त्यात रवी जयरामने 10 चौकारांसह 38 चेंडूत 55 धावा केल्या. एक्स्ट्रीमतर्फे जयंत जाधवने 22 धावात 5 गडी बाद केले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन विजेता व उपविजेता संघाला गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज रवी जयराम, उत्कृष्ट गोलंदाज संतोष सांबरेकर, अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर जयंत जाधव, उत्कृष्ट यष्टीरक्षक गजानन यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.