For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंबोर्गिनाच्या प्रमुखपदी निधी कैस्थ

06:22 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
लंबोर्गिनाच्या प्रमुखपदी निधी कैस्थ
Advertisement

कोलकाता :

Advertisement

लक्झरी कार निर्माती कंपनी लंबोर्गिनी इंडियाच्या प्रमुखपदी निधी कैस्थ यांची निवड करण्यात आली आहे. सदरच्या पदावर त्या 1 एप्रिल 2025 पासून रुजु झाल्या असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. आशिया पॅसिफीक विभागात पाहता सहावी मोठी बाजार पेठ असणाऱ्या भारतातील कंपनीची धुरा आता निधी यांना देण्यात आली आहे. विक्री, विपणन व विक्रीपश्चात सेवा याबाबी त्या यापुढे हाताळणार आहेत, असे कळते. यापूर्वी त्या पोर्शे इंडिया कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून विक्री विभागात कार्यरत होत्या. हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन व ऑटोमोटीव्ह इंडस्ट्रि अशा विविध व्यवसाय उद्योगात त्यांनी जवळपास 25 वर्षे सेवा बजावली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.