निकोल किडमन अन् कीथ झाले विभक्त
ऑस्ट्रेलियन-अमेरिकन अभिनेत्री निकोल किडमन स्वत:च्या आयुष्यातील उलथापालथीमुळे चर्चेत आहे. ती स्वत:चा पती कीथ अर्बनपासून विभक्त झाली आहे. विवाहाच्या 19 वर्षांनी त्यांचा संसार मोडला आहे. ऑस्कर विजेती अभिनेत्री निकोल आणि कंट्री म्युझिक स्टार कीथने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. निकोल आणि कीथ हे मागील काही महिन्यांपासून वेगळे राहत होते.
निकोल आणि कीथने 2006 साली सिडनी येथे विवाह केला होता. या दांपत्याला दोन मुली असून यात 17 वर्षीय संडे रोज आणि 14 वर्षीय फेथ मार्गरेट सामील आहे.
तीन महिन्यांपूर्वी निकोलने वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त कीथसाठी पोस्ट शेअर केली होती. परंतु दांपत्याच्या वैवाहिक जीवनात काही काळापासून तणाव होता असे समोर आले आहे. निकोलचा कीथपूर्वी टॉम क्रूजसोबत विवाह झाला होता. निकोल आणि टॉम क्रूजने इसाबेला आणि कॉनर यांना दत्तक घेतले होते.