For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनआयए पथकावर प. बंगालमध्ये गुन्हा

06:40 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
एनआयए पथकावर प  बंगालमध्ये गुन्हा
Advertisement

महिलेने केले विनयभंगाचा आरोप : टीएमसी नेत्यावरील कारवाईदरम्यान धुमश्चक्री, अधिकाऱ्यांवर हल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील भूपतीनगर, पूर्व मेदिनीपूर येथे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान एनआयए पथकावर झालेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर पोलिसांनी एनआयए टीमविऊद्धच एफआयआर नोंदवला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एनआयए टीम आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांविऊद्ध एफआयआर नोंदवला आहे. रात्री उशिरा एनआयए अधिकाऱ्यांनी तिच्या घराचे दरवाजे तोडले आणि विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानुसार भूपतीनगर येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

पूर्व मेदिनीपूरमध्ये तपास यंत्रणांच्या कारवाईदम्यान एनआयए अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला होण्याचा प्रकार घडला होता. धुमश्चक्रीनंतर एनआयएने हल्लेखोरांविऊद्ध भूपतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. एनआयएची एक टीम भूपतीनगर पोलीस ठाण्यात पोहोचली असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केले. यापूर्वी एनआयएचे आणखी एक पथक आले होते आणि त्यांच्याशी काही वाद झाल्याचे वृत्त आहे. या घटनेदरम्यान प्रथम एका वाहनाची तोडफोड करण्यात आली. या घटनेत एक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून अटकेचे प्रयत्न सुरू आहेत, असे एसपी सौम्यदीप भट्टाचार्य यांनी सांगितले.

बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान एनआयएच्या काही अधिकाऱ्यांवर कथितपणे मारहाण करण्यात आली होती. तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात पूर्व मेदिनीपूरला भेट देणाऱ्या एनआयएच्या पथकावर शनिवारी हल्ला करण्यात आला. एका व्यक्तीला अटक केल्यानंतर एनआयएच्या वाहनावर हल्ला करत त्याची तोडफोड करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. धुमश्चक्री व्हिडिओही व्हायरल झाला असून स्थानिक लोक एका वाहनाभोवती जमा होऊन एनआयए टीमला संशयिताला घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान गावकऱ्यांनी वाहनावर दगडफेकही केली. यापूर्वी 5 जानेवारी रोजी राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे ईडीच्या पथकावर असाच हल्ला करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.