महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एनआयएचे 5 राज्यात 22 ठिकाणी छापे

07:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहशतवादी कट आणि टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीत एकाचवेळी 22 ठिकाणी छापे टाकले. एनआयएने दहशतवादी कट प्रकरणी कारवाई केली आहे. यामध्ये अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती एनआयएने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील मालेगाव, जालना आणि संभाजीनगर येथे एनआयएच्या छाप्यांमध्ये एटीएसचे पथकही घटनास्थळी पोहोचले. एनआयएने मालेगाव येथील होमिओपॅथी क्लिनिकमधून तिघांना ताब्यात घेतले आहे. जालना येथूनही एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये ज्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकण्यात आला त्याचे नाव इक्बाल भट आहे. त्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे. याशिवाय काश्मीरमध्येही काही ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

दिल्लीतून दोघे ताब्यात

एनआयएने ईशान्य दिल्लीतील मुस्तफाबाद येथे टाकलेल्या छाप्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचाही सहभाग आहे. येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघे रडारवर असल्याचे समजते. छाप्यादरम्यान एनआयएला संशयास्पद साहित्य सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये 4 दिवसांपूर्वी छापे

एनआयएने पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांमध्ये 1 ऑक्टोबर रोजी एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने दक्षिण 24 परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता येथे 11 ठिकाणी संशयितांच्या घरांची झडती घेतली होती. संबंधित लोक सीपीआय (माओवादी) कार्यकर्ते असल्याचा दावा एनआयएने केला असून नक्षलवादी कारवाया करण्यासाठी त्यांनी संघटनेच्या कमांडरना मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. झडतीदरम्यान अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article