For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत 11 ठिकाणी एनआयएचे छापे

06:45 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत 11 ठिकाणी एनआयएचे छापे
Advertisement

हिज्ब-उत-तहरीर संघटनेच्या विरोधात कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

जगभरातील अनेक देशांमध्ये प्रतिबंधित असलेली संघटना हिज्ब-उत-तहरीर विरोधात एनआयएने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कटाप्रकरणी तामिळनाडूतील 11 ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. हिज्ब-उत-तहरीरशी संबंधित लोकांच्या घरी तपास यंत्रणेने झडती घेतली आहे. यापूर्वी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेत लोकांची भरती करण्यात आल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला होता. आता हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे.

Advertisement

रोयापेट्टा येथे राहणारे पितापुत्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना हिज्ब-उत-तहरीरमध्ये सामील करण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश केले होते असे चेन्नई पोलिसांकडून सांगण्यात आले होते. अशाच प्रकारच्या प्रकरणाशी निगडित यापूर्वी अटक करण्यात आलेल्या काही आरोपींची चौकशी केली जत आहे. चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळाल्यावर पुदुक्कोट्टई, कन्याकुमारी आणि तांबरम समवेत 11 ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत.

या संघटनेवर लोकांचा ब्रेनवॉश करण्याचा आरोप आहे. संघटना युवांचे ब्रेनवॉश करून त्यांच्याकडून देशविरोधी कारवाया घडवून आणते. युवांना दहशतवादासाठी प्रवृत्त करत असल्याने या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी मध्यप्रदेशात हिज्ब-उत-तहरीरशी संबंधित 16 जणांना अटक करण्यात आली होती. यातील निम्मे आरोपी हे धर्मांतरानंतर मुस्लीम झाले होते. ही संघटना धर्मांतराच्या घटनांमध्ये सामील असल्याचे मानले जाते. या कट्टरवादी संघटनेचे उद्देश भारताला इस्लामिक राष्ट्र करणे आहे. या संघटनेची स्थापना 1952 मध्ये जेरूसलेम येथे झाली होती.

Advertisement
Tags :

.