For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल विरोधात एनआयए चौकशीची शिफारस

06:32 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल विरोधात एनआयए चौकशीची शिफारस
Advertisement

खलिस्तान समर्थकांकडून देणगी स्वीकारल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आता एनआयएकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केजरीवाल यांच्या विरोधात एनआयए चौकशीची शिफारस केली आहे.

Advertisement

खलिस्तान समर्थक संघटना शिख फॉर जस्टिसकडून देणगी स्वीकारल्याप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात एनआयए चौकशी करण्यात यावी असे उपराज्यपालांनी म्हटले आहे. संबंधित आरोप मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहेत. भारताकडून बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेकडून एका राजकीय पक्षाला लाखो डॉलर्सचा कथित वित्तपुरवठा झाला आहे. याप्रकरणी फॉरेन्सिकसह अन्य तपासाची गरज असल्याचे उपराज्यपालांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

देवेंद्र पाल भुल्लरची मुक्तता आणि खलिस्तान समर्थकांना प्रोत्साहन देण्यासाठी खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसकडून आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्स प्राप्त झाल्याची तक्रार उपराज्यपालांना प्राप्त झाली होती. केजरीवाल यांच्या सरकारने राष्ट्रपतींना भुल्लरच्या सुटकेची शिफारस केली होती असे सक्सेना यांनी गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

संबंधित तक्रार वर्ल्ड हिंदू फेडरेशन इंडियाचे राष्ट्रीय महासचिव आशू मोंगिया आणि आम आदमी पक्षाचा माजी कार्यकर्ता मुनीष कुमार रायजादा यांनी केली होती. देविंदर पाल सिंह भुल्लर हा 1993 च्या दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरला आहे. भुल्लरला दिल्लीत युवा काँग्रेस मुख्यालयाबाहेर घडविण्यात आलेल्या स्फोटाप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 31 जण जखमी झाले होते. जर्मनीतून प्रत्यार्पण करत भुल्लरला अटक करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.