For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खलिस्तानी नेटवर्कवर एनआयएची मोठी कारवाई

06:39 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
खलिस्तानी नेटवर्कवर एनआयएची मोठी कारवाई
Advertisement

पंजाब-हरियाणात एकाचवेळी 15 ठिकाणी छापे

Advertisement

वृत्तसंस्था/ जालंधर

खलिस्तानी नेटवर्क नष्ट करण्यासाठी एनआयए अॅक्शन मोडमध्ये आहे. एनआयएकडून बुधवारी खलिस्तानी दहशतवाद्यांशी निगडित अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. पंजाब-हरियाणातील 15 ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. यापूर्वीही एनआयएकडून अनेक राज्यांमध्ये खलिस्तानी नेटवर्कचा छडा लावण्यासाठी अशाचप्रकारची कारवाई करण्यात आली होती.

Advertisement

अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय दूतावासाबाहेरील निदर्शने आणि गोंधळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूकडून धमकी देण्यात आल्यानंतर एनआयएने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात एनआयएने 6 राज्यांमधील 51 ठिकाणी छापे टाकले होते. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारत यांच्या संबंधांमध्ये आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एनआयएने हे पाऊल उचलले होते.

तर दिल्लीत दोन महिन्यांपूर्वी एका उ•ाणपूलावर खलिस्तान समर्थनार्थ पोस्टर झळकविल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हरियाणातून एका युवकाला अटक केली होती. गुरपतवंत सिंहच्या निर्देशावर या युवकाने दिल्ल तसेच अन्य ठिकाणी अशाप्रकारची पोस्टर्स चिकटविली होती असा आरोप आहे.

एनआयएने अलिकडेच शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंन सिंह पन्नू विरोधात गुन्हा नोंदविला होता. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांना धमकी देणारा व्हिडिओ जारी केल्याप्रकरणी हे पाऊल उचलण्यात आले होते.19 नोव्हेंबर आणि त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांमधून प्रवास करू नका असे पन्नूने या व्हिडिओत म्हटले होते. जागतिक स्तरावर एअर इंडियाचे संचालन करू दिले जाणार नसल्याची धमकी त्याने दिली होती. यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता आणि कॅनडा, भारत तसेच अन्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला होता.

Advertisement
Tags :

.