For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे न्हावेली - मातोंड रस्ता बनला चिखलमय

11:56 AM May 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे न्हावेली   मातोंड रस्ता बनला चिखलमय
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला न्हावेली - मातोंड हा अंदाजे अडीज किलोमीटरचा रस्ता ठेकेदाराने अपुर्ण अवस्थेत ठेवल्यामुळे मान्सूनपूर्व कोसळलेल्या पावसामुळे चिखलमय बनला आहे.सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर प्रवास करणे नागरिकांना जोखमीचे बनले आहे . संबंधित ठेकेदारांकडून नवीन रस्ता बनवण्यासाठी जुन्या रस्त्याची जेसीबी आणून खोदाई करुन घेतली आणि सदरील रस्ता अर्धवट स्थितीत सोडून दुसऱ्या कामासाठी यंञसामग्री घेऊन गेल्याने रस्ता पुर्णपणे उखडलेल्या स्थितीत राहीला, त्यानंतर अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता अक्षरक्षः चिखलमय बनला त्यामुळे वाहनधारक, नागरीकांना प्रवास करणे धोकादायक बनले असून याबाबत नागरीकांनी ठेकेदारावर संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे दोन गावातील संपर्क तुटला आहे. या प्रकाराची बांधकाम विभागाने दखल घेण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.