For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेमारकडून निवृत्तीचे संकेत

06:49 AM Feb 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेमारकडून निवृत्तीचे संकेत
Advertisement

वृत्तसंस्था / सॅन्टोस (ब्राझील)

Advertisement

ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू 34 वर्षीय नेमारने आपल्या व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रातून 2026 अखेर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. नेमारने ब्राझील संघाचे प्रतिनिधीत्व करताना फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सातत्याने दर्जेदार कामगिरी यापूर्वी केली आहे. आता चालु वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलच्या संघामध्ये नेमारला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

2025 साली नेमारला गुडघादुखापतीच्या समस्येमुळे वारंवार त्रास होवू लागला होता. त्यामुळे त्याने या दुखापतीवर शस्त्रक्रिया करवून घेतली. नेमार हा सॅन्टोस, बार्शिलोना फुटबॉल क्लबचा भरवशाचा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. नेमारने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीत आतापर्यंत 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात ब्राझीलचे प्रतिनिधीत्व करताना 79 गोल नोंदविले आहेत.2026 सालातील फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा 13 जूनपासून खेळविली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.