For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेमारकडून निवृत्तीची घोषणा

06:15 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेमारकडून निवृत्तीची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था, ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी : नेमारने रविवारी नॉर्वेविऊद्ध 2-1 असा पराभव होऊन ब्राझीलचा संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने जाहीर केले की तो आता ब्राझीलच्या राष्ट्रीय संघासाठी खेळणार नाही. मी प्रयत्न केला. याची सुऊवात मेटलाइफ स्टेडियमवर झाली होती आणि येथेच मी समारोप केला. आता हे सर्व संपले आहे, असे तो म्हणाला.

Advertisement

34 वर्षीय नेमार 10 ऑगस्ट, 2010 रोजी ब्राझीलसाठी आपला पहिला सामना खेळला होता. हा सामना उत्तर न्यू जर्सीमधील मेडोलँड्स येथील स्टेडियमवर अमेरिकेविऊद्ध झालेला एक मैत्रीपूर्ण सामना होता. नॉर्वेविऊद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यानंतर त्याने शेवटच्या काही मिनिटांत पेनल्टी किकद्वारे गोल केला. उजव्या पायाच्या पोटरीच्या जुन्या दुखापतीमुळे नेमारला या स्पर्धेत ब्राझीलच्या पाचपैकी केवळ दोन सामन्यांत खेळता आले. गट फेरीतील सामन्यात स्कॉटलंडविऊद्ध तो फक्त 15 मिनिटे मैदानात होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.