नेक्स्ट्रा आधुनिक, मजबूत डाटा केंद्र उभारणार
प्रकल्पासाठी एअरटेलची नेक्स्ट्रामध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक 120 हून अधिक एज सुविधा
नवी दिल्ली :
नेक्स्ट्रा आता भारतात एक आधुनिक आणि मजबूत डेटा सेंटर नेटवर्क उभारणार आहे. एंटरप्राइज, हायपरस्केलर आणि सरकारी गरजा पूर्ण करते. सध्या कंपनीची क्षमता सुमारे 300 मेगावॅट आहे आणि पुढील काही वर्षांत ती 1 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. तसेच, सुमारे 25 टक्के बाजारपेठेतील हिस्सा मिळवण्याचीही कंपनीची योजना असल्याचे कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष, गोपाल विट्टल यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांसोबतची धोरणात्मक भागीदारी ही कंपनीच्या विकास योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे विस्ताराचा वेग वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. वाढती मागणी लक्षात घेता, गुंतवणूकही वाढवली जाणार असल्याचेही नमूद केले आहे.
कार्लाइल इंडिया
अॅडव्हायझर्सचे भागीदार, कपिल मोदी म्हणाले की, एअरटेलसोबतची त्यांची भागीदारी मजबूत आहे आणि भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी नेक्स्ट्रा योग्य स्थितीत आहे. अल्फा वेव्ह ग्लोबलचे सह-संस्थापक आणि सीआयओ, रिक गेर्सन म्हणाले की, त्यांची कंपनी एआय-आधारित व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि नेक्स्ट्रासोबतच्या भागीदारीबद्दल उत्साहित आहे. या सहकार्यामुळे कंपनीला भारतातील अग्रगण्य डेटा सेंटर कंपनी बनण्यास मदत होणार आहे. कंपनी पुढील काळात आणखी गुंतवणूक करत विस्तार करणार आहे.
नेक्स्ट्रा देशभरातील विस्तार
नवी दिल्लीत मुख्यालय असलेल्या नेक्स्ट्राचे देशात 14 डेटा सेंटर्स
कंपनी को-लोकेशन, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनेज्ड होस्टिंग, डेटा बॅकअप आणि डिझास्टर रिकव्हरी यांसारख्या सेवा पुरवते.
पुण्यात एक आधुनिक सुविधा असून, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता येथे नवीन एआय-सज्ज कॅम्पस विकसित करत आहे.