For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येत्या वर्षी ‘आयपीएल’ 14 मार्च ते 25 मेपर्यंत

06:22 AM Nov 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
येत्या वर्षी ‘आयपीएल’ 14 मार्च ते 25 मेपर्यंत
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पुढील वर्षीची इंडियन प्रीमियर लीग 14 मार्च ते 25 मे या कालावधीत आयोजित केली जाईल, असे बीसीसीआयने आयपीएल संघांना सांगितले आहे. तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे मांडण्यात आलेल्या विस्तृत योजनेत 2026 आणि 2027 च्या आवृत्त्यांसाठी देखील असाच कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

बीसीसीआयने रविवारी जेद्दाह येथे होणाऱ्या दोन दिवसीय खेळाडूंच्या महालिलावात दुखापतग्रस्त इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, भारतीय वंशाचा अमेरिकन वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर आणि मुंबईचा यष्टिरक्षक- फलंदाज हार्दिक तमोरे यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संघांना पाठविलेल्या निवेदनात मंडळाने म्हटले आहे की, खेळाडूंच्या लिलावाच्या नियोजनात संघांना मदत करण्यासाठी पुढील तीन हंगामांच्या तारखा एकाच वेळी जाहीर केल्या जात आहेत. त्यानुसार स्पर्धेची 2026 ची आवृत्ती 15 मार्चपासून सुरू होईल आणि 31 मे रोजी ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

2027 ची आवृत्ती 14 मार्च रोजी सुरू होऊन 30 मे रोजी अंतिम फेरी होईल. तिन्ही अंतिम फेऱ्या रविवारी होतील. आयपीएल साडेदहा आठवडे चालेल याची खात्री करण्यासाठी बीसीसीआयने सामन्यांची संख्या वाढविण्याची योजना आखली होती आणि ठरविलेला कालावधी पाहता लीगमधील सामन्यांची संख्या वाढेल, असे दिसते.

संघांना गुऊवारी पाठविलेल्या ईमेलमध्ये आयपीएलने या स्पर्धेचा कालावधी जाहीर केलेला असला, तरी त्या अंतिम तारखा देखील ठरण्याची शक्यता आहे. 2025 च्या मोसमात 74 सामने असतील, जसे ते मागील तीन आवृत्त्यांमध्ये राहिले आहेत. 2022 मध्ये ‘आयपीएल’ने जी 84 अशी सामन्यांची संख्या दिली होती त्यापेक्षा ते 10 कमी आहेत. 2022 साली जेव्हा 2023-27 कालावधीसाठी  मीडिया अधिकार विकले गेले होते तेव्हा निविदा दस्तैवजात आयपीएलने प्रत्येक हंगामासाठी वेगवेगळ्या सामन्यांची यादी मांडली होती. त्यानुसार 2023 आणि 2024 मध्ये 74 सामने, 2025 आणि 2026 मध्ये 84 आणि 2027 मध्ये कमाल 94 सामने होणार होते.

संघांना मोठी चालना देण्यासाठी प्रमुख कसोटी खेळणाऱ्या देशांच्या परदेशी खेळाडूंना त्यांच्या मंडळांकडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामांत सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याला पाकिस्तान अपवाद आहे, ज्यांचे खेळाडू दुसऱ्या हंगामापासून आयपीएलमध्ये सहभागी झालेले नाहीत.

Advertisement
Tags :

.