नेक्स्ट जनरेशन संरक्षण तंत्रज्ञानांचे होतेय परीक्षण
बबीना फील्ड फायरिंग रेंजचा सैन्यप्रमुखांचा दौरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्य अनेक अत्याधुनिक संरक्षण प्रणालींचे युद्धसदृश स्थितींमध्ये परीक्षण करत आहे, जेणेकरून त्यांच्या कामगिरीचे सखोल मूल्यांकन करता येऊ शकेल. या परीक्षणांचा उद्देश सैन्याच्या तांत्रिक क्षमतेला मजबूत करणे आणि याच्या संचालन तत्परतेला वाढविणे आहे.
मूल्यांकन टप्प्याला सामारे जाणाऱ्या सैन्य सामग्रीत मानवरहित हवाई प्रणाली (युएएस), युएव्ही लाँच्ड प्रिसिजन गायडेड म्युनिशन (युएलपीजीएम), रनवे इंडिपेंडेट (आरडब्ल्यूआय) रिमोटली पायलेटेड एरियल सिस्टीम (आरपीएएस) आणि काउंटर-युएएस समाधान सामील असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
आत्मनिर्भरतेबद्दल वचनबद्धता
या मूल्यांकनाच्या माध्यमातून भारतीय सैन्याचे लक्ष्य स्वत:च्या तांत्रिक आघाडीला विस्तार देणे, संचालन तत्परतेला चालना आणि संरक्षण क्षमता विकासात स्वदेशी नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेबद्दल वचनबद्धतेची पुष्टी करणे आहे. भारतीय सैन्य सध्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज, बबीना फील्ड फायरिंग रेंज आणि जोशीमठ समवेत देशभरातील प्रमुख स्थानांवर क्षमता विकासासाठी परीक्षण करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलिकडेच बबीना फील्ड फायरिंग रेंजचा दौरा करत कामगिरीची समीक्षा तसेच सर्व घटकांशी चर्चा केली आहे. आत्मनिर्भर भारत पुढाकाराच्या अंतर्गत विकसित अत्याधुनिक तंत्रज्ञानांची विस्तृत साखळी प्रदर्शित करण्यात आली असून याचा उद्देश स्वदेशी क्षमतेच्या विकासात वेग आणणे असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
नेक्स्ट जनरेशन सैन्य सामग्रीत वर्टिकल लाँच ड्रोन, एकीकृत ड्रोन डिटेक्शन, आणि इंटरडिक्शन सिस्टीम, कमी वजनाचे रडार, आयआर सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर प्लॅटफॉर्म सामील आहे. या परीक्षणात मोठ्या संख्येत संरक्षण उद्योग भागीदार सहभागी होत असून ते भारतीय सैन्य आणि देशांतर्गत निर्मात्यांदरम्यान वाढता ताळमेळ दर्शवित आहेत.