महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंडची द. आफ्रिकेवर 528 धावांची आघाडी

06:45 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिली कसोटी, विल्यम्सनचे सलग दुसरे शतक

Advertisement

वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई (न्यूझीलंड)

Advertisement

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान न्यूझीलंड संघाची स्थिती अधिक भक्कम झाली असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर 528 धावांची मजबूत आघाडी मिळवली आहे. या सामन्यात केन विल्यम्सनने सलग दुसरे शतक झळकविले. त्याने पहिल्या डावात 118 तर दुसऱ्या डावात 109 धावा जमविल्या.

या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव 511 धावांवर आटोपला. विल्यम्सनचे शतक तसेच रचिन रविंद्रचे द्विशतक ही वैशिष्ट्यो ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या नील ब्रँडने 119 धावांत 6 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 80 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 72.5 षटकात 162 धावांत आटोपला. त्यांच्या उर्वरित 6 गड्यांनी 82 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात पीटरसनने 6 चौकारांसह 45 तर बेडिंगहॅमने 5 चौकारांसह 32, हमझाने 4 चौकारांसह 22 तर मुरने 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि सँटेनर यांनी प्रत्येकी 3 तर जेमिसन व रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 349 धावांची मजबूत आघाडी मिळविली. न्यूझीलंडने उपलब्ध असूनही दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला नाही. न्यूझीलंडने दिवसअखेर दुसऱ्या डावात 43 षटकात 4 बाद 179 धावा जमवित 528 धावांची भक्कम आघाडी घेतली. केन विल्यम्सनने 132 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 109 धावा झळकाविल्या. कॉन्वेने 1 षटकारासह 29, रचिन रविंद्रने 1 चौकारासह 12 तर लॅथमने 3 धावा जमविल्या. मिचेल 11 तर ब्लंडेल 5 धावावर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेतर्फे ब्रँडने 52 धावात 2 तर स्वेर्ट आणि पॅटरसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून न्यूझीलंडचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव सर्व बाद 511 (रचिन रविंद्र 240, विल्यम्सन 118, फिलिप्स 39, हेन्री 27, मिचेल 34, ब्रँड 6-119, स्वेर्ट 2-61, मॉर्की आणि पॅटरसन प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका प. डाव 72.5 षटकात सर्व बाद 162 (पीटरसन 45, बेडींगहॅम 32, हमझा 22, ऑलिव्हर खेळत आहे 15, मुर 23, हेन्री 3-31, जेमीसन 2-35, सँटेनर 3-34, रचिन रविंद्र 2-16), न्यूझीलंड दु. डाव 43 षटकात 4 बाद 179 (विल्यम्सन 109, लॅथम 3, कॉन्वे 29, रचिन रविंद्र 12, मिचेल खेळत आहे 11, ब्लंडेल खेळत आहे 5, ब्रँड 2-52, पॅटरसन 1-38, स्वेर्ट 1-48).

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article