For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडकडून आयर्लंडला फॉलोऑन

06:44 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडकडून आयर्लंडला फॉलोऑन
Advertisement

नाथन स्मिथचे 6 बळी, आयर्लंड अद्याप 161 धावांनी पिछाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था, बेलफास्ट

येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. नाथन स्मिथ भेदक गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडचा पहिला डाव 179 धावांत आटोपल्याने त्यांना फॉलोऑन स्वीकारावा लागला. आयर्लंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर 5 बाद 150 धावा जमविल्या.

Advertisement

या कसोटीत न्यूझीलंडने पहिला डाव 8 बाद 490 धावांवर घोषित केला. त्यानंतर आयर्लंडने 2 बाद 65 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 45 षटकांत 179 धावांत आटोपला. अॅन्डी मॅकब्रीनेने एकाकी लढत देत 105 चेंडूत 12 चौकारांसह 73 तर मार्क अॅडेरने 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या. कर्णधार बेलबिरेनीने 13 धावांवर तर टेक्टर 16 धावांवर बाद झाले. आयर्लंडच्या पहिल्या डावांत 33 अवांतर धावा मिळाल्या. न्यूझीलंडतर्फे नाथन स्मिथने 40 धावांत 6 तर सिरेसने 27 धावांत 2, फॉक्स आणि टिकनेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 311 धावांची आघाडी मिळविल्याने त्यांनी आयर्लंडला फॉलोऑन दिला.

न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडच्या दुसऱ्या डावातही फलंदाजी कमकुवत झाली. दिवसअखेर त्याने 49.1 षटकांत 5 बाद 150 धावा जमविल्या. सलामीच्या डुहेनीने 9 चौकारांसह 57 धावा केल्या. एल. टकेर 1 षटकार आणि 6 चौकारांसह 39 धावांवर तर मॅकब्रीने 13 धावांवर खेण्त आहेत. न्यूझीलंडतर्फे ब्लेअर टिकनेरने 47 धावांत 4 तर नाथन स्मिथने 28 धावांत 1 गडी बाद केले. खेळाच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने आयर्लंडचे 13 गडी बाद केले. आयर्लंडचा संघ 161 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत.

संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड प. डाव 8 बाद 490-डाव घोषित, आयर्लंड प. डाव सर्वबाद 179 (अॅन्डी मॅकब्रीने नाबाद 73, मार्क अॅडेर 40, अवांतर 33, नाथन स्मिथ 6-40, सिरेस 2-27, फॉक्स आणि टिकनेर प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड दु. डाव 49.1 षटकांत 5 बाद 150 (डुहेनी 57, एल. टकेर खेळत आहे 39, अॅन्डी मॅकब्रीने खेळत आहे 13, बेलबिरेनी 14, अवांतर 10, ब्लेअर टिकनेर 4-47, नाथन स्मिथ 1-28).

Advertisement
Tags :

.