महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीची कसोटीतून निवृत्ती

06:27 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इंग्लंडविरुद्ध मायदेशात खेळणार शेवटचा सामना

Advertisement

वृत्तसंस्था/ ऑकलंड

Advertisement

न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊदीने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मायदेशातील मालिकेनंतर साऊदी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ही माहिती दिली. तसेच पुढील वर्षी जूनमध्ये न्यूझीलंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरल्यास साऊदी निवडीसाठी उपलब्ध असेल, असेही बोर्डाने यावेळी स्पष्ट केले.

2024 मध्ये क्रिकेटमधील अनेक बड्या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. या यादीमध्ये आता टीम साऊदीचेही नाव जोडले गेले आहे. साऊदी इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर तो निवृत्ती होईल्. या मालिकेतील पहिला सामना 28 नोव्हेंबरला सुरु होणार असून दुसरा सामना 6 ते 10 डिसेंबर आणि अंतिम सामना 14 ते 18 डिसेंबरला होणार आहे.

न्यूझीलंडसाठी खेळणे हा मोठा सन्मान

ब्लॅककॅप्ससाठी 16 वर्षे खेळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. परंतु ज्याने मला खूप काही दिले त्या खेळापासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी खूप खास आहे. ज्या संघाविरुद्ध माझा कसोटी प्रवास सुरु झाला होता, त्याच संघाविरुद्ध माझ्या आवडत्या तीन मैदानावर खेळून कसोटी प्रवास थांबवणे, हा माझ्यासाठी योग्य मार्ग आहे. मी खूप नशीबवान आहे की मला या प्रवासात कुटुंबिय, मित्र, प्रशिक्षक व न्यूझीलंड बोर्डाची मोलाची साथ मिळाली, असे साऊदी म्हणाला.

साऊदीची धमाकेदार कारकिर्द

न्यूझीलंड क्रिकेटसाठी मोलाचे योगदान साऊदीने 2008 मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि तो त्याचा अखेरचा कसोटी सामनाही इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. त्याने न्यूझीलंडसाठी 104 कसोटी सामने खेळताना 385 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सर रिचर्ड हॅडली (431) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे,  कसोटीमध्ये 300 पेक्षा जास्त विकेट, वनडेमध्ये 200 पेक्षा जास्त आणि टी 20 क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेणारा जगातील एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मापेक्षा जास्त षटकार मारले आहेत. साऊदीने कसोटीत 93 षटकार मारले आहेत. कसोटीत सेहवागने 91 तर रोहितने 88 षटकार मारले आहेत.

न्यूझीलंडसाठी प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता इंग्लंडविरुद्ध मालिकेत शानदार कामगिरी करत कसोटी कारकिर्दीचा शेवट गोड करायचा आहे.

टीम साऊदी, न्यूझीलंडचा वेगवान गोलदाज

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article