For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडसमोर स्पर्धेतून बाद होण्याचा धोका, आज विंडीजशी लढत

06:35 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडसमोर स्पर्धेतून बाद होण्याचा धोका  आज विंडीजशी लढत
Advertisement

वृत्तसंस्था/ तारौबा

Advertisement

न्यूझीलंड सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतून साखळी स्तरावरच बाहेर पडण्याच्या मार्गावर असून आज सहयजमान वेस्ट इंडिजविऊद्धची लढत त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ स्वरुपाची आहे. त्यामुळे अधिक सुधारित कामगिरी करण्याचा ते प्रयत्न करतील. प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून 84 धावांनी पराभूत होताना न्यूझीलंडची फलंदाजी 15.2 षटकांत 75 धावांत आटोपली होती.

या पराभवामुळे त्यांची धावसरासरी उणे 4.2 वर घसरली असून गट ‘ड’मधील संघांत ती सर्वांत कमी आहे आणि क्रमवारीत ते तळाशी आहेत. त्यामुळे गट स्तरावरच बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर ते पोहोचले आहेत. विश्वचषकातील उल्लेखनीय सातत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संघासाठी हे अनपेक्षित संकट आहे. अलीकडील सर्व सहा विश्वचषकांमध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठलेली आहे. 2015, 2019 आणि 2023 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धांत आणि 2016, 2021 आणि 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धांत त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

Advertisement

न्यूझीलंडचे फक्त दोन फलंदाज दुहेरी आकड्यातील धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाले आहेत आणि केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाला वेस्ट इंडिजसमोर आव्हान उभे करण्यासाठी फलंदाजीत चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. पण फक्त फलंदाजीच नव्हे, तर क्षेत्ररक्षणानेही त्यांची निराशा केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांनी सोपे झेल सोडले, यष्टिचित आणि धावचित करण्याच्या संधीही हुकविल्या.

दुसरीकडे, वेस्ट इंडिजला अशा कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागलेला नसून जर त्यांनी आज सलग तिसरा विजय मिळवला, तर सुपर एटमध्ये त्यांना प्रवेश मिळू शकेल. पापुआ न्यू गिनीविऊद्ध धडपडत मिळविलेल्या विजयाने सुऊवात केल्यानंतर विंडीजने त्यांच्या मागील सामन्यात युगांडावर 134 धावांनी विजय मिळवला.

सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.