For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडचा आयर्लंडवर डावाने विजय

06:11 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडचा आयर्लंडवर डावाने विजय
Advertisement

वृत्तसंस्था, बेलफास्ट

Advertisement

न्यूझीलंड संघाने यजमान आयर्लंडविरुद्धची एकमेव कसोटी एकतर्फी जिंकली. या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा एक डाव आणि 79 धावांनी दणदणीत पराभव केला. टॉम ब्लंडेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या एकमेव कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपला पहिला डाव 8 बाद 490 धावांवर घोषित केला. त्यानंतर न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा पहिला डाव 179 धावांत आटोपल्याने त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आली. फॉलोऑन स्वीकारल्यानंतर आयर्लंडने 2 बाद 65 धावसंख्येवरुन दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 232 धावांत आटोपला. सलामीच्या स्टिफेन डुहेनीने 9 चौकारांसह 57 तर लॉर्केन टकेरने 70 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50 तसेच मार्कअॅडेरने 47 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 44 धावा जमविल्या. कॅम्फर दुखापतीमुळे 4 धावांवर निवृत्त झाला. 63.2 षटकांत आयर्लंडचा दुसरा डाव 232 धावांवर समाप्त झाल्याने न्यूझीलंडने हा सामना एक डाव 79 धावांच्या फरकाने जिंकला. आयर्लंडच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडतर्फे ब्लेअर टिकनेरने 76 धावांत 5 तर नाथन स्मिथने 53 धावांत 2 तर फॉक्सने 1 गडी बाद केला. आयर्लंडच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या नाथन स्मिथने 40 धावांत 6 गडी बाद केले होते. या सामन्यात नाथन स्मिथने एकूण 8 बळी मिळविले.

Advertisement

संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड प. डाव 8 बाद 490 डाव घोषित, आयर्लंड प. डाव 45 षटकांत सर्वबाद 179, आयर्लंड दु. डाव 63.2 षटकांत सर्वबाद 232 (डुहेनी 57, बेलबिरेनी 14, लॉर्केन टकेर 50, मॅकब्रीने 13, मार्क अॅडेर नाबाद 44, मॅक्रेथी 11, अवांतर 24, टिकनेर 5-76, स्मिथ 2-53, फॉक्स 1-50).

Advertisement
Tags :

.