महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. जी. विश्वनाथन यांना न्यूयॉर्कची मानद डॉक्टरेट

10:17 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

Advertisement

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी)चे संस्थापक आणि कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांना नुकत्याच युएसएमधील बिंगहॅम्टन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (एसयुएनवाय)ची मानद डॉक्टर ऑफ लॉ पदवी मिळाली. डॉ. जी. विश्वनाथन यांना बिंगहॅम्टन विद्यापीठाचे अध्यक्ष हार्वे स्टेन्गर यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. डॉ. जी. विश्वनाथन यांना आंतरराष्ट्रीय उच्चशिक्षणातील योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे. ‘चांसलर विश्वनाथन हे भारतातील उच्चशिक्षणाच्या प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी आणि जगभरातील संस्थांसोबत भागीदारी करण्यासाठी अग्रणी आहेत,’ असे बिंगहॅम्टन विद्यापीठाचे अध्यक्ष हार्वे स्टेन्गर म्हणाले. बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटीचे प्रोव्होस्ट डोनाल्ड हॉल, डीन प्रा, श्रीहरी कृष्णस्वामी, सभासद डोना ए. लुपार्डो, सिनेट सदस्य लीआ वेब, व्हीआयटी उपाध्यक्ष श्री शंकर विश्वनाथन, डॉ. सेकर विश्वनाथन आणि डॉ. जी. व्ही. सेल्वम, दीक्षांत समारंभात साहाय्यक उपाध्यक्ष सुश्री कादंबरी एस. विश्वनाथन आणि डॉ. आर. सीनिवासन, संचालक, आंतरराष्ट्रीय संबंध, व्हीआयटीही उपस्थित होते.

Advertisement

दरम्यान, वॉशिंग्टन डीसी, यूएसए येथे डॉ. जी. विश्वनाथन यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये श्री कन्नन श्रीनिवासन, सिनेटर सदस्य, व्हर्जिनिया हाऊस ऑफ डेलिगेट्स, डॉ. पी. करूणाकरन, प्रमुख, शिक्षण विभाग, दूतावास यांचा समावेश होता. भारत, वॉशिंग्टन डी. सी., श्री बाला स्वामीनाथन, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ तामिळ संगम ईन नॉर्थ अमेरिका (एफईटीएनए), श्री बालागन अरूमुगासामी, माजी अध्यक्ष फेडरेशन ऑफ तामिळ संगम ईन नॉर्थ अमेरिका (एफईटीएनए), डॉ. वीरा वेणुगोपाल, अध्यक्ष, तामिळनाडू फाऊंडेशन, डॉ. प्रबू डेव्हिड, प्रोव्होस्ट, रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉ. जयचंद्रन, माजी वरिष्ठ प्राध्यापक, मॉन्टक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी, डॉ. श्रीदेवी सरमा, व्हाईस डीन, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, मेरीलँड, डॉ. पनीर सेल्वम, वरिष्ठ प्राध्यापक, आर्कान्सा विद्यापीठ, डॉ. व्ही. राजू, प्रोव्हॉस्ट, व्हीआयटी बेंगळूर आणि श्रीमती इंदिराणी राधाकृष्णन, सल्लागार, व्हीआयटी अॅल्युमनी असोसिएशन, उत्तर अमेरिका आणि व्हीआयटी अॅल्युमनी असोसिएशनच्या उत्तर अमेरिकन चॅप्टर्सच्या पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article