For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालच्या उपसागरात नव्या योद्ध्यांचे दर्शन

06:41 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
बंगालच्या उपसागरात नव्या योद्ध्यांचे दर्शन
Advertisement

क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आयएनएस खंजर, आयएनएस कोरा पूर्व नौदल कमांडमध्ये दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

जारी करण्यात आली असून या दोन्ही युद्धनौका खूपच प्रभावी असल्याचे दिसत आहेत. दोन्ही युद्धनौका अनेक सागरी ऑपरेशन्समधून परतल्या आहेत. नौदल सप्ताहाचा भाग म्हणून त्यांना कोलकाता येथील पूर्व नौदल कमांडमध्ये पाचारण करण्यात आले आहे. नौदलाचा स्थापना दिन 3 डिसेंबर रोजी होत असून त्यानिमित्त ही जहाजे येथे सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. दोन्ही युद्धनौका सार्वजनिक सहभाग कार्यक्रमाचा भाग आहेत.

Advertisement

आयएनएस खंजर आणि कोरा ह्या भारताच्या सागरी क्षमतेचे प्रदर्शन घडवणाऱ्या युद्धनौका आहेत. दोन्ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्यासाठी एक महत्त्वाची संपत्ती आहेत. त्या भारताच्या सागरी हल्ल्याच्या क्षमतेचे आणि किनारी सुरक्षेचे आधारस्तंभ आहेत. दोन्ही युद्धनौका संरक्षण क्षेत्रात भारताच्या स्वावलंबनाचे प्रतीक आहेत. ही मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी सुसज्ज जहाजे असून ती शत्रूच्या जहाजांवर, पाणबुड्यांवर किंवा किनारी लक्ष्यांवर अचूक प्रहार करतात. हल्ला करणाऱ्या या युद्धनौका समुद्रात शत्रूंविरुद्ध खंबीरपणे लढतात. तसेच प्रत्येक हल्ल्याला योग्य उत्तर देतात.

आयएनएस खंजर हे एक पी-25 वर्ग कॉर्व्हेट जहाज असून 1991 मध्ये नौदलात सामील करण्यात आले होते. हे खुकरी वर्गात विकसित केलेल्या जहाजांपैकी एक महत्त्वाचे कॉर्व्हेट आहे. त्याच्या वेगवान आणि चपळ कामगिरीमुळे त्याला ‘ग्रे फेरारी’ असेही म्हणतात. हे जहाज पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रs आणि आधुनिक सेन्सर सिस्टमने सुसज्ज आहे. कमांडिंग ऑफिसरच्या मते 34 वर्षे जुने हे जहाज संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशात कार्यरत आहे. त्याने लढाऊ ऑपरेशन्स, चाचेगिरीविरोधी मोहिमा आणि मानवतावादी मदत आणि बचावकार्यासह विविध मोहिमा पार पाडल्या आहेत.

आयएनएस कोराची कामगिरी

आयएनएस कोरा 1998 मध्ये नौदलात सामील करण्यात आली होती. हे पी-25ए वर्गाचे पहिले कॉर्व्हेट आहे. नेपाळची प्रसिद्ध राष्ट्रीय तलवार ‘कोरा’ वरून हे नाव देण्यात आले आहे. कॉर्व्हेट ही लहान, वेगवान आणि अत्यंत घातक युद्धनौका आहे. कोलकाता येथील जीआरएसई येथे बांधलेल्या या जहाजाचे प्राथमिक ध्येय भूपृष्ठ युद्ध आणि किनारी सीमा सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. त्याची चपळ रचना, उच्च गती आणि धोक्यांना त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता हे जहाज अद्वितीय बनवते. ते केवळ भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत नाही तर शेजारील देशांसोबतच्या संयुक्त सरावांमध्ये देखील भाग घेते.

Advertisement
Tags :

.