For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | सुरेखा न्यारे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; 'बदनामी थांबवा, संशयितांना अटक करा'; सुरेखा न्यारे यांच्या कुटुंबाची मागणी

04:20 PM Jul 30, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   सुरेखा न्यारे मृत्यू प्रकरणाला नवे वळण   बदनामी थांबवा  संशयितांना अटक करा   सुरेखा न्यारे यांच्या कुटुंबाची मागणी
Advertisement

शाहूवाडी -शिरगाव तालुका शाहूवाडी येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या मृत्यू प्रकरणी चुकीची बदनामीकारक फिर्याद देवून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत . हे पूर्णपणे खोटे असून त्यांच्या खून प्रकरणी संशयितांना तात्काळ अटक करावी .हा फोन आर्थिकव्यवहारातूनच घडला आहे या मागणीसाठी  मुलगा साहिल न्यारे यांच्या सह नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या सह शाहूवाडी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे .

Advertisement

 यानुसार  न्यारे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सुरेखा न्यारे यांची अत्यंत अमानुष व नियोजन पद्धतीने हत्या केली आहे .आर्थिक व्यवहारातूनच हा गुन्हा घडला असून पूर्व नियोजित कट असल्याचा संशय देखील आम्हास येत आहे .या कटात संशयताची पत्नी, आई ,अल्पवयीन मुलगा व भाचा यांनी संगनमताने कट केला आहे .घटनेच्या दिवशी संशयताच्या पत्नीने वारंवार फोन केला आहे . सदरच्या हालचाली या संशयास्पद असून या ठिकाणी त्याचे कॉल डिटेल्स व सीसीटीव्ही फुटेज तपासावे . तसेच संबंधित पुरावा नष्ट करण्याचा देखील संशय आहे या सर्व बाबीची गंभीर दखल घेऊन आपण निपक्ष तपास करावा असे निवेदन मयत सुरेखा न्यारे यांचा मुलगा साहिल न्यारे यांने दिले आहे

Advertisement
Advertisement
Tags :

.