For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयआरसीटीसी ची नवीन तिकीट बुकिंग सेवा सुरु

07:00 AM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयआरसीटीसी ची नवीन तिकीट बुकिंग सेवा सुरु
Advertisement

सर्व क्लासच्या जागा आता एकत्रितपणे दिसणार : ‘फास्टर चेकआउट’ सुविधा उपलब्ध होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट आयआरसीटीसीची नवीन आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. दररोज तिकीट बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांचा अनुभव अधिक सोपा आणि जलद करणे, हा या अपग्रेडचा मुख्य उद्देश आहे. नवीन वेबसाइटची बीटा आवृत्ती सुरू करण्यात आली आहे, म्हणजेच प्रवाशांच्या अभिप्रायानुसार वेबसाइटमध्ये रेल्वेकडून बदल केले जाणार आहेत.

Advertisement

नवीन वेबसाइटमध्ये कोणते अपडेट?

आयआरसीटीसी वेबसाइटची बीटा आवृत्ती 15 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता सुरू झाली. गेल्या महिन्यात जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला भेट दिलेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घोषणा केली की, आयआरसीटीसीची नवीन वेबसाइट 15 जुलैपर्यंत सुरू केली जाईल. घोषणेप्रमाणे नवी वेबसाइट अखेर सुरु झाली.

प्रवाशांसाठी नवीन बीटा वेबसाइटमध्ये प्रमुख सुधारणा

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रामुख्याने चार प्रमुख तांत्रिक सुधारणा केल्या आहेत.

स्मार्ट कॅप्चा : आता लॉगिन किंवा बुकिंग करताना त्रासदायक कॅप्चा दिसणार नाहीत. तसेच, अनावश्यक पॉप-अप, आकर्षक ग्राफिक्स आणि लक्ष विचलित करणारे घटकही नसतील.

जागांची उपलब्धता : आता वापरकर्त्यांना स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी यांसारख्या वेगवेगळ्या श्रेणींसाठी पुन्हा पुन्हा शोधावे लागणार नाही. सर्व श्रेणींमधील जागांची उपलब्धता क्रीनवर एकाचवेळी दर्शविली जाईल.

फास्ट चेकआउट : आयआरसीटीसीने बुकिंगसाठी ‘फास्ट चेकआउट’ वैशिष्ट्या सादर केले आहे. तिकीट बुक करताना प्रवाशांना ज्या पायऱ्या पार कराव्या लागत होत्या, त्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. कमी पायऱ्यांमुळे संपूर्ण बुकिंग प्रक्रियेस लागणारा वेळ कमी होईल.

इझी रिपीट बुकिंग : वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ‘इझी रिपीट बुकिंग’ सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांचा तपशील आधीच सेव्ह केला जाईल. पुढच्या वेळी तिकीट बुक करताना तुम्हाला नाव, वय इत्यादी इतर तपशील भरावे लागणार नाहीत.

आयआरसीटीसी वेबसाइटवर किती भार आहे?

2002 साली सुरू झालेली आयआरसीटीसी वेबसाइट ही देशातील सर्वात व्यस्त ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. पूर्वी, या वेबसाइटवरील रहदारी कमी होती, परंतु सध्या या वेबसाइटद्वारे दररोज सरासरी 14.5 लाख रेल्वे तिकिटे बुक केली जातात. एवढ्या मोठ्या वापरकर्ता वर्गाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय जलद सेवा देण्यासाठी आणि ती तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत ठेवण्यासाठी, या वेबसाइटची संपूर्ण रचना अद्ययावत करणे आवश्यक झाले होते,  अखेर रचना करण्यात आली.

बीटा वेबसाईट कशी अॅक्सेस केली जाईल?

प्रवासी नवीन पोर्टलचा अनुभव घेण्यासाठी http://https//www.irctc.co.in/eticket/या वेबसाईटला भेट देऊ शकतात. याशिवाय, जे प्रवासी आयआरसीटीसीच्या सध्याच्या होमपेज वेबसाईटला भेट देत आहेत, त्यांना मुख्य पेजवर या नवीन बीटा वेबसाईटला भेट देण्यासाठी थेट लिंक देखील देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.