चीनमध्ये मिळाली माणसांची नवी प्रजाती
डोक्याचा आकार होता मोठा
चीनमध्ये मोठ्या आकाराचे डोकं असलेल्या माणसांच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. या प्रजातीचे नाव होमो जुलुएनसिस म्हणजेच बिग हेड असे आहे. ही प्रजाती चीनमध्ये 3 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. सध्याच्या मानवाची उत्क्रांती ही होमो सॅपियन्सद्वारे झाली आहे. जी सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी विकसित झाली आणि मग वेगाने आफ्रिका, युरोप आणि आशियात फैलावली.
बिग हेड प्रजाती ही आधुनिक माणूस अस्तित्वावत येण्यापूर्वीच होमोनिन्स होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. होमोनिन्स हे 7-3 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते, चार लाख वर्षांपर्यंत पृथ्वीवर त्यांचे वास्तव्य होते. त्या काळात जगातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात माणसांच्या वेगवेगळ्या प्रजाती अस्तित्वात होत्या. युरोपमध्sय होमो हिडेलबर्गेनसिस आणि मध्य चीनमध्ये होमो लोंगी प्रजाती होती, त्यांचे जीवाश्म मिळाले आहेत. याचमुळे वैज्ञानिक त्यांचे अध्ययन करून त्या काळात देखील प्राचीन माणसांच्या अनेक प्रजाती होत्या याची पुष्टी करत आहेत.
होमो सॅपियन्सशी जोडलेले नाते
चीनमध्ये सध्या ज्या प्रजातीची पुष्टी झाली आहे, त्यांना वैज्ञानिक आर्केइक होमो सॅपियन्स देखील म्हणत आहेत. तसेच मिडिल प्लीस्टोसीन होमो देखील म्हटले जात आहे. म्हणजेच ही प्रजाती मधल्या कालखंडातील आहे. हवाई युनिव्हर्सिटीचे एंथ्रोपोलॉजिस्ट क्रिस्टोफर बे आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टीट्यूट ऑफ वर्टिब्रेटचे पॅलेंटियोलॉजिस्ट शियूजी वू यांनी माणसांची ही नवी प्रजाती शोधली आहे.
निएंडरथल माणसांसारखी कवटी
याचे अध्ययन पॅलियोएंथ्रोपोलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. यात उत्तर चीनमध्ये वेगळ्या प्रकारच्या माणसांचे जीवाश्म मिळाल्याचे म्हटले गेले आहे. या सांगाड्याची कवटी अत्यंत मोठी आणि रुंद होती, निएंडरथल माणसांप्रमाणे त्याचा आकार होता, परंतु यात आणखी डेनिसोवॅन प्रजातीदरम्यान काही साधर्म्य होते. जेव्हा या जीवाश्मांचे अध्ययन करण्यात आले तेव्हा मोठे डोकं असलेले हे प्राचीन मनुष्य होते असे कळले. ही प्रजाती सुमारे 3 लाख ते 50 हजार वर्षांपूर्वी पर्यंत अस्तित्वात होती. याचे जीवाश्म चीनच्या शुचांग आणि शुजियायोमध्ये मिळाले आहेत.