For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेघालयात मिळाली माशाची नवी प्रजाती

06:30 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मेघालयात मिळाली माशाची नवी प्रजाती
Advertisement

वैज्ञानिकांनी सांगितली वैशिष्ट्यो

Advertisement

वैज्ञानिकांच्या एका समुहाने बांगलादेश सीमेनजीक मेघालयाच्या दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात लोचची एक नवी प्रजाती शोधून काढली आहे. लोच हा गोड्या पाण्यात तळाशी राहणारा मासा आहे आणि तो दक्षिणपूर्व आशियात नद्यांमध्ये आढळून येतो. शिस्टुरा सोनारेंगेंसिस नावाच्या प्रजातीचा शोधत जिल्ह्यातील सानोरंगा, नाकामा आणि चियाबोल गुहांमध्ये लावण्यात आला असल्याचे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले.

लखनौ येथील आयसीएआरकडून अर्थसहाय्यप्राप्त या संशोधनाचे नेतृत्व लेडी कीन कॉलेजच्या प्राचार्य डॉ. खलूर मुखिम, गुवाहाटी विद्यापीठातील एक टीम तसेच अन्य लोकांनी केले आहे. हे संशोधन पक्ष अधिकृतपणे ब्रिटिश बेटसमुहाच्या फिशरीज सोसायटीच्या मत्स्य जीवविज्ञानाचे आंतरराष्ट्रीय नियतकालिक, विली-ब्लॅकवेलकडून प्रकाशित करण्यात आले.

Advertisement

मेघालयाच्या दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात तीन गुहांमध्ये नेमाचेलिड लोचची एक नवी प्रजाती आढळून आली आहे. ही प्रजाती स्वत:च्या मुख्यत्वे डोळे आणि मध्य-पार्श्व पट्टीवरील काळ्या डागांमुळे ओळखला जात असल्याचे नियतकालिकात नमूद करण्यात आले आहे.

गुहांमधील जलस्रोतात आढळणारा हा मासा काही प्रमाणात पिवळ्या रंगाचा असतो, परंतु जैंतिया आणि खासी हिल्समध्ये आढळून येणाऱ्या अन्य गुहांच्या प्रजातींप्रमाणे अंध नसतो. नव्या प्रजातीत प्रमुख डोळे आहेत आणि हा बराक-सूरमा-मेघना आणि ईशान्य भारताच्या आसपासच्या नद्यांमध्ये आढळून येणाऱ्या अन्य शिस्टुरा प्रजातींपेक्षा वेगळा असे असल्याचे मुखिम यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.