‘फोर मोर शॉट्स प्लीज’च्या नव्या सीझनची घोषणा
सयानी गुप्ता, कीर्ति कुल्हारी, बानी अन् मानवी पुन्हा एकत्र
भारतीय कॉमेडी ड्रामा ‘फोर मोर शॉट्स प्लीज’च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. हा या सीरिजचा अंतिम सीझन असणार आहे. प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित या सीरिजने बोल्ड आणि मोटिवेटिंग स्टोरीटेलिंग, आकर्षक व्हिज्युअल स्टाइल आणि सद्यकाळातील महिलांच्या जीवनातील उतारचढाव वास्तविक पद्धतीने दर्शवत प्रेक्षकांची मने जिंकली होती.
या सीरिजमध्ये 4 महिला मुख्य पात्रं असून ती यावेळी अधिक मस्ती, ड्रामासह परतणार आहेत. नव्या चॅप्टरमध्ये ओळख, स्वातंत्र्य अन् भावनात्मकतेला दर्शविण्यात येणार आहे. रोखठोक शैली असलेल्या या कहाणीने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. हा शो आजही दमदार, मोटिवेटिंग आणि एनर्जेटिक स्टोरीटेलिंगचे उदाहरण आहे. तसेच प्राइम व्हिडिओचा सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या भारतीय शोपैकी एक आहे.
‘फोर मोर शॉट्स प्लीज’च्या या सीझनमध्ये सयानी गुप्ता, कीर्ति कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरूसोबत लीझा रे, प्रतीक बब्बर, राजीव सिद्धार्थ, अंकुर राठी आणि मिलिंद सोमण यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. या सीझनची कहाणी देविका भगत यांनी लिहिली आहेत. तर संवादलेखन ईशिता मोइत्रा यांनी केले आहे. सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अरुणिमा शर्मा आणि नेहा माटियानी यांनी सांभाळली आहे.