For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Birth-Death Registration: विलंबाने जन्म-मृत्यू नोदींबाबतचे नवीन नियम काय आहेत? वाचा सविस्तर...

11:13 AM May 12, 2025 IST | Snehal Patil
birth death registration  विलंबाने जन्म मृत्यू नोदींबाबतचे नवीन नियम काय आहेत  वाचा सविस्तर
Advertisement

जन्म-मृत्यू नोंदीसंदर्भात 12 मार्च रोजी राज्य शासनाकडून नवीन निर्णय जारी

Advertisement

रत्नागिरी : विलंबाने जन्म-मृत्यू नोदींबाबत आता नवीन आणि अधिक काटेकोर नियम लागू करण्यात आले आहेत. स्थावर व जंगम मालमत्तेसंदर्भात अनेक दस्ताऐवजांसाठी लागणाऱ्या या जन्म-मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र घेतले जाते. मात्र अनेक परकीय नागरिकांकडून अशा विलंबाने जन्म-मृत्यू नोंदी प्रमाणपत्र घेतले गेल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे.

त्यामुळे या नोंदी मिळवून हमखास होणारी फसवणूक आणि या नोदींचा वापर करून करण्यात येणारे गैरप्रकार टाळण्यासाठी आता हे अधिक काटेकोर नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. जन्म-मृत्यू नोंदीसंदर्भात 12 मार्च रोजी राज्य शासनाकडून नवीन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Advertisement

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबत आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. जन्म व मृत्यू यांची अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासाठी निबंधक म्हणून जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे, त्यांनाच हे अधिकार दिले गेले आहेत.

विलंबाने जन्म-मृत्यू नोंदीसाठी अर्ज दाखल करताना जोडावे लागणार 'हे' पुरावे

  • जन्माच्या अनुषंगाने-रुग्णालयाच्या नोंदीचे, लसीकरणाचे पुरावे.
  • मृत्यूच्या अनुषंगाने-शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल, रुग्णालयीन कागदपत्रेशैक्षणिक पुरावे-शाळेच्या प्रवेश-निर्गम रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला.
  • रहिवासाचे पुरावे-मालमत्ता कराची पाbirth and death registration ती, पाणीपट्टी, वीजबील इ. मालमत्तेचे पुरावे-सातबारा उतारा, नमुना 8-अ चा उतारा, वारस नोंदीचे फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत दस्त इ.
  • ओळखीबाबतचे पुरावे-वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधारकार्ड, बँक / पोस्ट पासबुक, पॅनकार्ड, जॉबकार्ड, .
  • कौटुंबिक पुरावे-परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र इ.

काटेकोर नियमांमुळे अनेक गैरप्रकार रोखण्यास मदत

विलंबाने जन्म-मृत्यू नोंदीसाठी नवीन शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेले अटी आणि नियम अधिक काटेकोर करण्यात आले आहेत. यामुळेच या जन्म-मृत्यू नोंदीसंदर्भात होणारी फसवणूक आणि गैरप्र्रकार रोखण्यास मदत होईल. तसेच परकीय नागरिकांकडून अशा पद्धतीच्या नोंदी घेण्याचे प्रमाण रोखले जाईल, असे रत्नागिरी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.