For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महुआ मोईत्रा यांच्यावर पक्षाची नवी जबाबदारी

06:31 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
महुआ मोईत्रा यांच्यावर पक्षाची नवी जबाबदारी
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपांनी घेरलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पक्ष नेतृत्त्वाने नवी जबाबदारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मोईत्रा यांची कृष्णानगर (नदिया उत्तर) जिल्ह्याच्या पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी या नव्या जबाबदारीबद्दल पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. महुआ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे.

‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात अडकल्यामुळे मोईत्रा यांचे नाव सध्या चर्चेत आहे. हे प्रकरण संसदेच्या शिष्टाचार समितीपर्यंत पोहोचले असून तपास पूर्ण केल्यानंतर समितीने महुआविरोधात 10 नोव्हेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अहवाल पाठवला आहे. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई करायची याचा निर्णय सभापती घेणार आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 15 ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून ‘कॅश फॉर क्वेरी’चे प्रकरण उघड केले होते. महुआ यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी आपला लोकसभा वेबसाईटचा पासवर्ड अन्य व्यक्तीला दिल्याचा प्रकारही उघड झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.