For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युपीआय व्यवहारांचा नवा विक्रम, 1344 कोटी व्यवहार

06:42 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
युपीआय व्यवहारांचा नवा विक्रम  1344 कोटी व्यवहार
Advertisement

मार्चमधील कामगिरी :  विक्रमी 19.78 लाख कोटी रुपयांचे व्यवहार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मार्च 2024 मध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयच्या माध्यमातून व्यवहाराचा नवा विक्रम प्रस्थापित झाल्याची माहिती आहे. सदरच्या महिन्यात 1344 कोटी इतके देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत. यायोगे जवळपास 19.78 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर येते आहे.

Advertisement

यंदा 55 टक्के वाढ

फेब्रुवारी महिन्यात पाहायला गेल्यास युपीआयद्वारा 1201 कोटी व्यवहार झाले होते, ज्यामार्फत 18.28 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. मागच्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या व्यवहारांचा विचार करता यंदा 55 टक्के वाढ दिसली आहे. तर रक्कमेचा विचार करता जवळपास 40 टक्के अधिक रक्कमेचे युपीआय व्यवहार झाले आहेत. मार्च 2023 मध्ये 14.05 लाख रुपयांचे व्यवहार झाले होते.

आर्थिक वर्षात 13 हजार कोटी व्यवहार

याच युपीआय पेमेंट प्रणालीमार्फत आर्थिक 2023-24 वर्षात 13 हजार कोटी पेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारामार्फत एकंदर 199.95 लाख कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत हे व्यवहार 43 टक्के अधिक आहेत.

युपीआय कसे काम करते?

युपीआय ही एक सेवा आहे. जी वापरण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज लागणार आहे. यावर आपला पत्ता द्यावा लागेल. तसेच बँकेतील खाते क्रमांक नोंद करावे लागेल. हे खाते जोडल्यानंतर बँकेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड आदी आवश्यक माहिती भरावी लागेल. पैसे पाठवणारा आपल्या मोबाइल क्रमांकाशी संपर्क साधेल. पेमेंट रिक्वेस्ट प्रोसेसची विचारणा झाली की आपल्याकडे असणारा कोड (इमेल आयडी किंवा मोबाइल नंबर किंवा आधार नंबर वा अन्य)वापरला की व्यवहार पूर्ण होतो. युटिलीटी बिल पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग, इतर खरेदी आदीसाठी क्रेडिट वा डेबिट कार्डची गरज लागत नाही. ही सर्व कामे युपीआयच्या माध्यमातून करता येतात.

Advertisement
Tags :

.