मे महिन्यात युपीआय व्यवहारात नवा विक्रम
एनपीसीआयची माहिती : मे महिन्यात मूल्य 29 लाख कोटींवर पोहचले
वृत्तसंस्था, मुंबई
युनिफाईड पेमेंटस् इंटरपेस अर्थात युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या देवाणघेवाणीच्या संख्येत आणि मूल्यांमध्ये मे महिन्यात नवा विक्रम नोंदवला गेला. या दरम्यान देवाणघेवाणीचे मूल्य 3 टक्के वाढत 29.90 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यामध्ये हेच मूल्य 29.03 लाख कोटी रुपये होते. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली.
मे महिन्यात युपीआय देवाणघेवाणीची संख्या 4 टक्के वाढत 23.20 अब्जवर पोहोचली आहे. जी एप्रिलमध्ये 22.35 अब्ज इतकी होती. एप्रिल 2016 मध्ये युपीआयचे कामकाज सुरुवात झाल्यानंतर पाहता आतापर्यंतची सर्वाधिक व्यवहारांची संख्या व मूल्य मे महिन्यामध्ये नोंदले गेले आहे. एप्रिल महिन्यात देवाण घेवाणीची संख्या 1.3 टक्के आणि मूल्य 1.7 टक्के इतके घसरले होते. एप्रिल महिन्यात
कमी दिवसांमुळे हा परिणाम दिसला होता. मार्चमध्ये आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने देवाणघेवाणीच्या व्यवहारात वाढ झाली होती. मे महिन्यात दररोज युपीआय व्यवहार 74.8 कोटी इतके दिसून आले. एप्रिल महिन्यात 74.5 कोटी इतके व्यवहार झाले होते.
क्रेडिट कार्डचा वापर
या व्यतिरिक्त क्रेडीट कार्डच्या माध्यमातून उच्च किमतीची देवाणघेवाण वाढताना दिसत आहे. 2021 मध्ये 8.9 लाख कोटी रुपये इतके क्रेडीट कार्ड देवाणघेवाणीचे असणारे मूल्य वाढत 2025 मध्ये 23.2 लाख कोटीरुपयांवर पोहोचले. रोजच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारासाठी आता ग्राहक मोठ्या प्रमाणात यूपीआय सेवेचा वापर करून घेत आहे. स्थानिक व्यापारी, सार्वजनिक वाहतूक सेवा आणि क्विक कॉमर्स यासारख्या क्षेत्रामध्ये युपीआयद्वारे रक्कम भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.