महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘हीरो हीरोइन’मध्ये दिव्या चित्रपटाचे नवे पोस्टर जारी

06:06 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘हीरो हीरोइन’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून तिचे चाहते उत्सुक झाले आहेत. सुरेश कृष्ण यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात एक सत्य प्रेमकथा दर्शविली जाणार आहे.

Advertisement

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ‘हीरो हीरोइन’द्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट तेलगूसोबत हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. प्रेरणा अरोडा यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Advertisement

ही माझी आतापर्यंतची सर्वात आशादायक भूमिका आहे. हीरो हीरोइनच्या जगात पाऊल ठेवण्याचा अनुभव नेहमीच माझ्या मनात स्थान राखून राहणार असल्याचे दिव्याने म्हटले आहे. दिव्याचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिव्या यापूर्वी ‘यारियां’ या चित्रपटात दिसून आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article