महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजयकडून नवा पक्ष अन् चिन्हाची घोषणा

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

Advertisement

तमिळ चित्रपटसृष्टीचा मेगास्टार विजयला चाहते ‘थलपति’ नावाने ओळखतात. विजयने आता राजकारणात प्रवेश केला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याने स्वत:चा नवा पक्ष ‘तमिझागा वेट्रिकाझागम’च्या स्थापनेची घोषणा केली होती. गुरुवारी त्याने या दिशेने पाऊल टाकत चेन्नईच्या पक्षमुख्यालयात अधिकृतपणे पक्षाचा ध्वज आणि चिन्ह सादर केले आहे. यावेळी पक्षाचे गीतही सादर करण्यात आले. विजयचा अत्यंत मोठा चाहतावर्ग आहे, हा चाहतावर्ग त्याच्या पक्षासाठी कमीतकमी 10 टक्के मते मिळवून देऊ शकतो.

Advertisement

विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. युवा आणि महिलांदरम्यान तो अत्यंत लोकप्रिय आहे. पक्ष लवकरच एक विशाल संमेलन आयोजित करणार आहे. त्यावेळी टीव्हीकेची मूल्ये आणि उद्दिष्टांची रुपरेषा मांडण्यात येईल. यापूर्वी मी स्वत:साठी जगत होतो, परंतु आता माझे जीवन तामिळनाडूच्या लोकांसाठी समर्पित करू इच्छितो असे विजय यांनी सभेला संबोधित करताना म्हटले.

विजय याच्या पक्षाला राजकीय क्षेत्रात द्रमुक, अण्णाद्रमुक या दोन पक्षांच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. हे दोन्ही पक्ष दशकांपासून तामिळनाडूच्या राजकारणावर स्वत:चे वर्चस्व ठेवून आहेत. भाजप देखील राज्यात स्वत:ची उपस्थिती सातत्याने वाढवत आहे. द्रमुक नेते करुणानिधी आणि अण्णाद्रमुक सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे रजनीकांत आणि कमल हासन यासारख्या अभिनेत्यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article