नवीन कांदा 300 रुपयांनी कमी रताळी दरात दोन हजाराची घसरण
वार्ताहर/अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये बुधवारच्या बाजारात नवीन कांद्याची आवक वाढल्याने नवीन कांद्याच्या दरात क्विंटलला 300 रुपयांनी भाव कमी झाला तर रताळ्याचा भाव क्विंटलला 2000 रुपयांनी घसरला. महाराष्ट्र आणि कर्नाटक जुन्या कांद्याचा भाव मात्र क्विंटलला स्थिर आहे आणि बेळगाव जवारी बटाटा भावही स्थिर आहे. अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटीलनी दिली.. शनिवारच्या बाजारात मार्केट यार्डमध्ये नवीन कांद्याची आवक येण्यास प्रारंभ झाला होता आणि भाव देखील 2000 पासून 4500 पर्यंत झाला होता. यावेळी आवक कमी प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाला होता तर जुना महाराष्ट्र कांदा दर 4000 ते 5000 पर्यंत झाला होता आणि कर्नाटक जुना 4800 रुपये क्विंटल झाला होता. तसेच शनिवारच्या बाजारात रताळ्याची आवक कमी झाली असून यावेळी महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये उपवास असल्याकारणाने रताळ्याचा दर क्विंटलला 3000 ते 5000 रुपये पर्यंत झाला होता. मात्र, आज बुधवारच्या बाजारात रताळ्याचे सुमारे 800 पोती आवक विक्रीसाठी आली असून मागणी देखील थंडावली होती व राज्यातून मागणी मंदावल्याने रताळ्याच्या दरात क्विंटलला दोन हजार रु. घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी आहे.
120 ट्रक नवीन कांदा दाखल
कर्नाटकातील लोकापूर मुधोळ यरगट्टी बागलकोट या भागातील यंदाच्या हंगामातील नवीन कांद्याच्या सुमारे 120 ट्रक कांदा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये दाखल झाला होता तर महाराष्ट्रातील. जुना कांदा सुमारे 20 ट्रक आवक दाखल झाली होती एकूण 140 ट्रक कांदा बाजारात आल्याने नवीन कांद्याच्या दरात सुमारे तीनशे ऊपयाने घट झाली तर महाराष्ट्र आणि कर्नाटक जुना कांदा दर स्थिर झाला नवीन कांद्याला दिल्ली, चेन्नई, रायचूर, गुजरात, मध्य प्रदेशमधून मागणी आहे