For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हल्दियामध्ये नौदलाचा नवा तळ

07:00 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
हल्दियामध्ये नौदलाचा नवा तळ
Advertisement

बंगालच्या उपसागरात वाढणार दबदबा : चीन-पाकिस्तान-बांगलादेशवर राहणार नजर

Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

भारतीय नौदल पश्चिम बंगालच्या हल्दियामध्ये एक नवा सागरी तळ निर्माण करत आहे. ही सुविधा हल्दिया बंदर प्राधिकरणाच्या सहकार्याने विकसित केली जातेय. या नौदल तळावर फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट (एफआयसी) आणि फास्ट अटॅक क्राफ्ट (एफएसी) यासारख्या नौकांना तैनात करण्यात येणार आहे. या नौका किनारी सुरक्षा आणि घुसखोरीविरोधी अभियानांसाठी आदर्श मानल्या जातात.

Advertisement

प्रारंभिक टप्प्यात हल्दियामध्ये एक विशेष जेटी तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून छोट्या नौकांना सहजपणे डॉक करता येऊ शकेल. हल्दिया एक व्यग्र व्यापारी बंदर आहे. नौदलाच्या युद्धनौकांची ये-जा व्हावी म्हणून हल्दिया बंदर प्राधिकरणासोबत मिळून तेथे सुविधा विकसित करण्यात येत आहे. चेन्नई, तूतीकोरिन आणि मंगळूरमध्येही नौदल बंदर प्राधिकरणांसोबत समन्वय राखून कार्य करते.

मागील काही काळात बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संरक्षण संबंध अत्यंत दृढ झाले आहेत. तसेच चीनच्या उपस्थितीमुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. अशास्थिती या संचालन सुविधेमुळे नौदल या त्रिकोणाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवू शकणार आहे. हल्दियामध्ये नौदलाच्या उपस्थितीमुळे पूर्व समुद्र किनाऱ्यावर भारताची मोहिमात्मक पोहोच आणि बंगालच्या उपसागरात भारताचा दबदबा वाढणार आहे. हल्दियामध्ये नौदलाचे केंद्र असल्याने युद्धनौकांना कोलकात्यामधून हुगळी नदीचा मोठा प्रवास करावा लागणार नाही, यामुळे आपत्कालीन स्थितीत वेगाने त्या समुद्रात पोहोचू शकतील.

Advertisement
Tags :

.