एमजी कॉमेटचे नवे मॉडेल लाँच
अत्याधुनिक फिचर्ससोबत कार बाजारात : सर्वात स्वस्त गाडी असल्याचा कंपनीचा दावा
नवी दिल्ली :
भारतीय बाजारात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या गाडीचे नाव एमजी कॉमेट ब्लॅकर्सार्म असे आहे. या गाडीमध्ये अत्याधुनिक फिचर्स देण्यात आली आहेत. एमजी कॉमेटची सुरुवातीची किंमत अंदाजे 7.80 लाख रुपयांपासून सुरु आहे. ग्राहकांच्यासाठी 11,000 रुपये भरुन गाडी बुक करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
अन्य फिचर्स...
?कारला ब्लॅक फिनिशड कॉमेट नेमप्लेट आणि इंटरनेट इनसाइट लोगो देण्यात आला आहे.
?स्मार्ट फिचर्सची सुविधाही मिळणार असून यात 4 स्पीकर साउंड सिस्टम आणि मोठी स्क्रीन आहे.
? ईव्ही कॉमेटमध्ये आता 10.25 इंच इंस्ट्रूमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इंफोटेनमेंट, वायरलेस अँड्राईड ऑटो, अॅपल
कारप्ले आदी फिचर्स राहणार
? गाडीत 17.4 केडब्लूएच क्षमतेची बॅटरी आहे.
? एका चर्जावर अंदाज 230 किमी इतकी रेंज प्राप्त होणार आहे.